संगमनेर मध्ये श्रीराम कथेचे आयोजन ; मालपाणी लॉन्स मध्ये चालणार नऊ दिवस धार्मिक उत्सव     |      काकडवाडीच्या महालक्ष्मी मंदिरातील सोने अन् ऐवज चोरणारी टोळी जेरबंद, सापळा रचला अन् असं केलं जेरबंद     |      पुणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार     |      दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याचा प्रशासनाचा निर्णय  ?     |      संगमनेरातील अतिक्रमणांवर पुन्हा जेसीबी!     |      संगमनेर शहरात शिवजयंती उत्सव वादावर तोडगा काढण्याचे काम सुरू     |     
संगमनेर शहरातील पाच अवैध कत्तलखाने जमीनदोस्त. By Admin 2025-02-21

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




मुख्य कत्तलखान्यांचे काय?

संगमनेर - अनाधिकृतपणे सुरू असलेल्या संगमनेर शहरातील कत्तलखान्यांना पालिकेने नोटीसा बजावल्या होत्या. मात्र याकडे दुर्लक्ष करत हे कत्तलखाने सुरूच असल्याने अखेर गुरुवारी सकाळी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत पाच अवैध कत्तलखाने जमिनदोस्त केले.पालिकेने पाच कत्तलखाने जमीनदोस्त केल्याचे

वृत्त समाधानकारक असले तरी मुख्य कत्तलखान्यांचे काय असा प्रश्न अद्यापही कायम आहे. कारण शहरात अधिक कत्तलखाने असून काही ठराविक कत्तलखान्यांवरच कारवाई झाल्याचे दिसते. कारवाईदरम्यान अनुचित प्रकार घडू यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या कत्तलखाने सुरू असून याची माहीती पोलीस व पालिका प्रशानला होती. यातील बहुतांशी कत्तलखान्यांवर पोलिसांनी वारंवार छापे देखील मारून कारवाया केल्या आहे. मात्र पोलीस तात्पुरती कारवाई करत असल्याने याचा फायदा हे कत्तलखाना चालक घेत होते. यामुळे शहरातील जमजम कॉलनी, मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालयामागील रमाई गार्डनच्या शेजारी पाच अवैध कत्तलखाने सुरू होते.याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही संख्या वाढत राहिल्याने पालिकेने या सर्व अनाधिकृत कत्तलखाना मालकाला नोटीस बजावून हे काढुन घेण्यास सांगितले होते. हे अनाधिकृत कत्तलखाने सुरूच राहिल्याने अखेर नगर पालिका व पोलीस प्रशासनाने गुरुवारी (दि 20) संयुक्त मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला.गुरूवारी सकाळी पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, अभियंता महेश गोर्डे आदिसह कर्मचारी जेसीबी, ट्रॅक्टर साहीत्य घेवून घटनास्थळी दाखल झाले. सोबत पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आदिसह मोठा पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी होता.सकाळी १० वाजता मोहीम राबविण्यास सुरूवात केली. यावेळी काही कत्तलखाना चालकाने सुरुवातीला थोडासा विरोध करण्याचा प्रयत्न केला पण पोलिस बळापुढे काहीच निभाव लागला नाही. सुमारे सहा तास ही कारवाई सुरू होती पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने सर्व अनाधिकृत कत्तलखाने उध्वस्त करण्याची कारवाई केली. जमजम कॉलनी आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस माता रमाई गार्डनच्या शेजारी असलेले चार कत्तलखाने व रमाई गार्डनच्या शेजारील एक असे एकूण पाच अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले आहे. यापुढे देखील अवैध कत्तलखान्याचा कारवाईचा बडगा सुरू राहणार असून कत्तलखान्यांची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्याबाबत माहिती मिळाली असता नऊ जणांना नोटीस देण्यात आल्या होत्या. यात चार जणांनी कत्तलखाने बंद करून त्याचे रूपांतर घरात केले होते. मात्र इतर पाच जणांचे कत्तलखाने सुरूच असल्याने संगमनेर नगरपालिका व प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करत पाचही कत्तलखाने जमीनदोस्त केले.

 

रामदास कोकरे, मुख्याधिकारी तथा प्रशासक.