संगमनेर मध्ये श्रीराम कथेचे आयोजन ; मालपाणी लॉन्स मध्ये चालणार नऊ दिवस धार्मिक उत्सव     |      काकडवाडीच्या महालक्ष्मी मंदिरातील सोने अन् ऐवज चोरणारी टोळी जेरबंद, सापळा रचला अन् असं केलं जेरबंद     |      पुणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार     |      दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याचा प्रशासनाचा निर्णय  ?     |      संगमनेरातील अतिक्रमणांवर पुन्हा जेसीबी!     |      संगमनेर शहरात शिवजयंती उत्सव वादावर तोडगा काढण्याचे काम सुरू     |     
संगमनेर शहरात शिवजयंती उत्सव वादावर तोडगा काढण्याचे काम सुरू By Admin 2025-03-11

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




प्रशासनाची विविध गटाशी चर्चा, पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे

संगमनेर -  संगमनेर शहरात बस स्थानकावर शिवजयंती उत्सवा साजरा करण्यावरून  काँग्रेस व  शिवसेनेमध्ये झालेल्या वादातनंतर विविध गटातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.सोमवारी बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिली.
दरम्यान बस स्थानकावर शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यात रविवारी सायंकाळी झालेल्या वादानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवत वादाच्या ठिकाणी दोन पोलीस व्हॅन उभ्या उद्या करण्यात आल्या आहे. सोमवारी (दि १०) दिवसभर बस स्थानक परिसरात  बंदोबस्त तैनात करून पोलीस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून होते.  कोणत्याही पदाधिकाऱ्याला अथवा कार्यकर्त्याला वादाच्या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला होता. पोलीस प्रशासन काँग्रेस शिवसेना व इतरही गटातील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. हा वाद टाळावा व यातून मार्ग निघावा यासाठी सोमवारी चर्चा सुरू होती. मात्र दोन्ही गट एकाच ठिकाणी शिवजयंती उत्सवाचा देखावा करण्यावर ढाम असल्याने वाद टाळण्यासाठी पोलीस मध्यस्थी करत आहे. या वादात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना  तटस्थ आहे. त्यांचे विद्यमान पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसैनिक पुढे आले नाही. शिवजयंती उत्सवात मात्र ते सहभागी होणार आहे.
यातच महायुतीच्या वतीने तारखेनुसार शिवजयंती साजरी केली आहे. यात महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजपा सह मित्र पक्ष सहभागी झाले होते. एकदा शिवजयंती साजरी केल्यानंतर पुन्हा शिवजयंती साजरी करण्याबाबत आता उलट सुलट चर्चा होऊ लागले आहे. काँग्रेस पक्षाने पुढाकार घेत बस स्थानकावर शिवाजी महाराजांच्या मंदिराचा देखावा उभा करण्याचा निर्णय घेतला मात्र ही बाब विखे गटाला खटकल्याने सर्व राजकीय ड्रामा उभा करण्यात आला.
यातच याला राजकीय पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. शिवजयंती उत्सव शांततेत साजरा करावा यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. बस स्थानकावर देखावा उभारण्यावरून झालेला वादाला राजकीय किनार असल्याने पोलिसही आता सावध झाले आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस राजकीय पक्ष विविध संघटना गटांशी चर्चा करत आहे. सोमवारी पोलिसांनी या वादावर विविध संघटनांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. एक दोन दिवसात यातून मार्ग निघेल यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करत आहे. यात प्रांत अधिकारी शैलेश हिंगे, नगरपालिका मुख्याधिकारी रामदास कोकरे, बस बस स्थानक आगार प्रमुख हे सर्वच सामूहिकपणे पोलीस प्रशासनाला मदत करत आहे.