संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च     |      प्रवरानदी पात्रात वाळू चोरी करताना तस्कराला रंगेहात पकडले ! सहा जणांवर गुन्हा दाखल     |      अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी     |      सिंचनापासून वंचित राहिलेल्या सर्व गावांचे होणार सर्वेक्षण     |      अनिल शिंदे यांना बंधू शोक     |      संगमनेरमध्ये सराईतांच्या दोन टोळ्या पकडल्या! सात आरोपींना अटक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त     |      संगमनेरमध्ये गोवंश हत्यासत्र सुरूच; पोलीस, पालिका प्रशासनाबरोबरच 'हिंदुत्ववादी' आणि 'मुस्लिम' नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह     |      शरद पवारांचे ५० % लाडक्या बहिणींना तिकीट, स्थानिक स्वराज्य निवडणुकीआधी मोठी घोषणा....     |      नाशिक-पुणे महामार्गावर अपघातः आयशर टेम्पो आणि बस यांच्यात धडक; एक गंभीर जखमी     |      शेतात काय करता असे म्हणत बाप-लेकाला मारहाण ! पाच जणांवर गुन्हा दाखल     |     
जवळे कडलग - वडगाव लांडगा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थांमधून संताप By Admin 2025-04-07

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




जवळे कडलग - वडगाव लांडगा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थांमधून संताप

संगमनेर : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेले तालुक्यातील जवळे कडलग  ते वडगाव लांडगा या रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून रखडले आहे.  रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याने या रस्त्यावरून ये - जा करणे अवघड होत आहे.यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.                          जवळे कडलग ते वडगाव लांडगा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे ‌. या रस्त्याची दुरुस्ती करावी याबाबत ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली ‌  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. ३ कोटी २५ लाख रुपये या रस्त्याच्या कामासाठी मंजूर झालेले आहे. या रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात आल्यानंतर या रस्त्याचे काम येवले कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले.
विधानसभा निवडणुका होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटूनही या रस्त्याचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. तालुक्यात राजकीय सत्तांतर झाल्याने राजकीय श्रेय  वादात या रस्त्याचे काम अडकले असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या या रस्त्याचे काम सुरू न झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड होत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत  करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी तालुक्यामध्ये एकच अभियंता आहे , या अभियंत्याला बसण्यासाठी कार्यालय नाही.  या खात्याच्या माध्यमातून तालुक्यात होणाऱ्या रस्त्यांच्या कामाची   अधीक्षक अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याने  चौकशी करावी अशी मागणी या भागातील  ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील देशमुख, संदेश देशमुख, सुरेश कडलग, गोरख लांडगे, मदन देशमुख, सोमनाथ लांडगे, बापू देशमुख, अशोक देशमुख आदींनी केली आहे.