दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
राज्यात वीजदरात मोठी कपात; आजपासून १०% स्वस्त वीज!
मुंबई : वाढत्या वीजदरामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. आजपासून (ता.१) वीज स्वस्त होणार आहे. महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता.
प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, वीजदर १० टक्क्यांनी कमी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यात पुढील ५ वर्षे वीज स्वस्त होणार आह
स्मार्ट मीटर (टीओडी) बसविणाऱ्या औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच आणि रात्री बारा ते सकाळी सहापर्यंतच्या वीज वापरास १०-३० टक्के वीजदर सवलत मिळेल. मात्र सायंकाळी पाच ते रात्री १०-१२ वाजेपर्यंतच्या वीज वापरासाठी २० टक्के जादा मोजावे लागतील. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार २०२५-२६ या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे १० टक्के कपात होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवे वीजदर आजपासून लागू होणार आहेत. कृषी ग्राहकांसाठी औद्योगिक, वाणिज्यिक व अन्य ग्राहकांवर पडणारा क्रॉस सबसिडीचा बोजा एक एप्रिलपासून पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे वीजदर कमी होऊन दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीजदर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा काही दिवसांपूर्वी पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती. या घोषणेनुसार वीजदरात बदल करण्यात आले आहेत.
अशी असेल महावितरणची वेळ व दर
वेळ दर
रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत १० ते ३० टक्के (सूट)
सायं. ५ ते रात्री १० वाजेपर्यंत २० टक्के (जादा)