अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करा -- मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी     |      श्रीरामनवमी निमित्ताने संगमनेरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची भव्य दिव्य शोभायात्रा     |     
श्रीरामनवमी निमित्ताने संगमनेरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची भव्य दिव्य शोभायात्रा By Admin 2025-04-02

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




श्रीरामनवमी निमित्ताने संगमनेरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची भव्य दिव्य शोभायात्रा

संगमनेर (प्रतिनिधी)- श्रीराम नवमी निमित्ताने विश्व हिंदू परिषद बजरंग दल, दुर्गावाहिनी- मातृशक्ती आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत भव्य दिव्य शोभायात्रा रविवार, दि. ०६ एप्रिल २०२५ रोजी सायं. ५:०० वाजता संगमनेर येथील अभिनव नगर येथील श्रीराम मंदिर येथून निघणार आहे. श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव रविवार, दि. ०६ एप्रिल रोजी दुपारी १२:००वा. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व बजरंग दल शाखा व प्रमुख मंदिरे, श्रीराम मंदिरे व हनुमान मंदिरात जन्मोत्सवाचे विविध कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेले आहे. शोभायात्रेत भव्य दिव्य धार्मिक देखावे, अयोध्येतील श्रीरामलल्ला यांची भव्य दिव्य मूर्ती, महाबली हनुमान मूर्ती, केरळ येथील पारंपारिक नृत्य व पारंपारिक वाद्ये, श्रीराम रथ, श्रीराम पंचायत, भजनी मंडळ, उज्जैन महाकाल डमरू पथक, तैजूर ढोल ताशा पथक, सनई- चौघडे, घोडे-उंट, आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी अशी भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रा मार्गः नवीन नगर रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, चावडी, मेनरोड, सय्यद बाबा चौक, तेलीखुंट, नेहरू चौक, चंद्रशेखर चौक येथील मोठे मारुती मंदिर व श्रीराम मंदिर येथे महाआरती होवून शोभायात्रेची सांगता होईल. भव्य दिव्य शोभायात्रेत सर्व हिंदू बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विहिंप अहिल्यानगर जिल्हामंत्री विशाल वाकचौरे यांनी केले आहे.