दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत आशीर्वाद पतसंस्थे समोर जाहीर सभा
संगमनेर (प्रतिनिधी)--संगमनेर शहरातील सर्व नागरिकांनी राजकारण विरहित एकत्र येऊन स्थापन केलेल्या संगमनेर सेवा समितीच्या वतीने व्हिजन 2.0 हा जाहीरनामा शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वा. आशीर्वाद पतसंस्था समोर महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रसिद्ध होणार असून यावेळी जाहीर सभा होणार आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे विकासातून वैभवशाली ठरले आहे. विकासाची ही परंपरा कायम ठेवण्याबरोबर मागील एक वर्षापासून संगमनेर अशांत करणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी संगमनेर मधील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन राजकारण विरहित संगमनेर सेवा समिती स्थापन केली आहे. संगमनेर 2.0 अंतर्गत पुढील पाच वर्षाची नियोजन घेऊन संगमनेर मधील 11257 नागरिकांच्या सूचना घेऊन आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेर 2.0 हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे.