दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
सरावलेला आरोपी आणि संगमनेर पोलिसांची संशयास्पद भूमिका...
संगमनेर प्रतिनिधी
स्थानिक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह संपूर्ण जिल्ह्यातीलच वरिष्ठ अधिकारी अमली पदार्थांच्या विक्रीला आवडत्या लोभापाई पाठीशी घालत असल्याने संगमनेरातली अमली पदार्थाची विक्री करणारे करणारा तोच तोच सरावलेला आरोपी आणि कारवाईचा देखावा करणाऱ्या पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर येत आहे.सुमारे एक वर्षापूर्वी गांजा आणि गर्द विक्री करणारा आरोपी एलसीबीने पकडला होता. त्याच्यावर अमली पदार्थविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तोच आरोपी पुन्हा एक वर्षांनी त्याच परिसरात पान टपरी मधून खुलेआम गांजा विकताना पकडला जातो. म्हणजे संगमनेर पोलिसांचा कारभार कसा आहे हे उघड होत असून सरावलेल्या या आरोपीला कुठलाही धाक राहिलेला नाही.नार्कोटिक्स सारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असून देखील पुन्हा अमली पदार्थाची विक्री करण्यास घाबरत नसलेला हा सरावलेला आरोपी संगमनेर पासून ते थेट जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांशी गोड हितसंबंध ठेवून असल्याचे बोलले जात आहे.
अंबादास शिंदे (राहणार मालदार रोड, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर) याला वर्षांपर्वी स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून गांजा आणि गर्द विक्री करताना पकडले होते. त्यावेळी सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला होता. आरोपीला अटक करण्यात आले होते. परंतु थोड्याच दिवसात आरोपी जामीनावर सुटून पुन्हा अमली पदार्थच विक्री करण्याचा अवैध धंदा करीत असल्याचे नव्या ताज्या घटनेने उघडकीस आले आहे. त्यामुळे जामीनावर असलेला आरोपी पुन्हा तोच धंदा करतो म्हणजे पोलिसांशी त्याचे लागेबांधे किती खोल प्रमाणात आहेत हेच दिसून येत असल्याचा आरोप नागरिक करतात.सदर आरोपीवर अशाच प्रकारचे विविध गुन्हे दाखल आहेत. अशा आरोपींना गंभीर गुन्हे दाखल होऊनही तडीपार केले जात नाही. त्यांच्याकडून मिळत असलेला मलीदा हा सर्वांना हवाहवासा असतो. त्यामुळे कारवाई केली जात नाही. विशेषतः तपासात सुद्धा काहीच आढळून येत नसल्याचे चित्र आहे. या आधी सुद्धा गांजा आणि गर्द सारख्या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या या आरोपीच्या गुन्ह्याच्या तपासात पुढे काहीच आढळून आलेले नाही. हा माल येतो कुठून ? याचा मुख्य सूत्रधार कोण ? मुख्य पुरवठादार कोण ? साथीदार कोण ? याचा कुठलाही तपास (संगमनेर पोलीस) तपास अधिकाऱ्याला लागलेला नाही. त्यामुळे तपासाचा दर्जाही दिसून येतो. सर्वच मिलीभगत असल्याने तपास प्रामाणिकपणे केलाच जात नाही असाही आरोप पोलिसांवर होतो.
वसुलीच्या अंतर्गत वादातून गुन्हा दाखल...
तोच आरोपी, तोच गुन्हा, तोच धंदा, तोच परिसर.. पोलीस मात्र निवांत. सदर आरोपीवर वर्षभरात दोन वेळा अमली पदार्थ विक्रीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. सरावलेला आरोपी पुन्हा उघडपणे तोच धंदा करतो हे पोलिसांना माहीत नाही असे शक्यच नाही. कारण पोलिसांना अशा आरोपींवर कायम नजर ठेवावी लागते. पोलिसांनी आंधळ्याचे सोंग घेतल्याने हा अवैध धंदा पुन्हा जोरात सुरू होता. मुळात देण्याघेण्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा आहे. पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या विविध शाखाआणि देणे घेणे यातील वसुलीच्या वादातून हा गुन्हा दाखल होण्याचा प्रकार झाला आहे. शहर पोलीस ठाणे अतर्गत असलेली डीबी शोध पथक हेच वसुली पथक असल्याचे सांगितले जाते. आमच्यातले कोण कोण तुझ्याकडून हप्ता घेतात आणि तोही आम्हाला डावलून घेतात ? असा राग काही अधिकाऱ्यांना आल्याने ही कारवाई झाली असल्याचे बोलले जात आहे. गुन्हा दाखल करण्याआधी पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये सदर आरोपीकडून याबाबत दोन तास अशी चौकशी सुरू असल्याची माहिती समजली आहे.