लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी डॉक्टर अमोल कर्पे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी     |      ५० हजाराच्या लाच प्रकरणात पत्रकार आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात     |      महाविद्यालयातील तरुणीवर अत्याचार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल     |      संगमनेर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी राजेश मालपाणी तर व्हा.चेअरमनपदी मधुसूदन नावंदर यांची एकमताने निवड     |      हनुमान जयंती उत्सवात धुडगूस घालणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एक अल्पवयीन     |      जवळेकडलग - वडगाव लांडगा रस्ता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच     |     
कोयत्याचा धाक दाखवून दहशत व लुटमार करणारी टोळी पकडली ! By Admin 2025-03-06

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेर उपविभागीय पोलीस पथकाची कारवाई

संगमनेर प्रतिनिधी दि. 6
सर्वसामान्य नागरिकांना कोयता या घातक शास्त्राचा धाक दाखवून दादागिरी करत त्यांच्याकडून अंगावरील सोन्याचे दागिने, पैसे लुटून पळून जाणारी टोळी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने मोठ्या शितापीने पकडली आहे. याबाबत पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांनी प्रेस नोट द्वारे माहिती दिली आहे.याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. गणेश बबन कुरकुटे (वय 23) सार्थक उल्हास कुरकुटे (वय 20) प्रथमेश शांताराम दुधवडे (वय 19) आणि दोन विधी संघर्षित बालक (सर्वजण राहणार कुरकुटवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर)या आरोपींनी संगमनेर तालुक्यात लुटमारीचा मोठा धुमाकूळ घातला होता. अनेक तक्रारी त्यांच्या बाबत करण्यात आल्या होत्या. या टोळीला पकडल्यानंतर त्यांनी केलेले दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत. दोन विधी संघर्षित बालक आरोपी वगळता इतर तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.मंगळसूत्र गंठण चोरी करणारे लुटमार करणारे हे आरोपी संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या कुरकुटवाडी या ठिकाणी असल्याचे खात्रीशीर माहिती पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली. त्यानंतर पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अनिल उगले यांच्या पथकाने उपाध्यक्ष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून आरोपींना पकडले.