लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी डॉक्टर अमोल कर्पे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी     |      ५० हजाराच्या लाच प्रकरणात पत्रकार आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात     |      महाविद्यालयातील तरुणीवर अत्याचार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल     |      संगमनेर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी राजेश मालपाणी तर व्हा.चेअरमनपदी मधुसूदन नावंदर यांची एकमताने निवड     |      हनुमान जयंती उत्सवात धुडगूस घालणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एक अल्पवयीन     |      जवळेकडलग - वडगाव लांडगा रस्ता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच     |     
संगमनेर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी राजेश मालपाणी तर व्हा.चेअरमनपदी मधुसूदन नावंदर यांची एकमताने निवड By Admin 2025-04-17

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी राजेश मालपाणी तर व्हा.चेअरमनपदी मधुसूदन नावंदर यांची एकमताने निवड

संगमनेर (प्रतिनिधी) " संगमनेर परिसरातील उद्योग व्यवसायांच्या विकासाची गंगोत्री म्हणून लोकमान्यता मिळालेल्या मर्चंट बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षामध्ये एक हजार कोटींचे भव्य लक्ष गाठण्याचा संकल्प करण्यात आला आहे. बँकेवर मनापासून प्रेम करणारे सर्व घटकांच्या साथीने हा गोवर्धन पर्वत उचलण्यामध्ये नक्कीच यश मिळेल" असा विश्वास संगमनेर मर्चंट बँकेचे नवनियुक्त चेअरमन उद्योगपती राजेश मालपाणी यांनी येथे व्यक्त केला. 
  जिल्हा उपनिबंधक संतोष मधुकर कोरे व सहकार अधिकारी राजेंद्र वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दोन्ही पदांसाठी अनुक्रमे राजेश मालपाणी आणि मधुसूदन नावंदर यांचेच अर्ज दाखल झाल्यामुळे दोघांचीही एकमताने बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हा उपनगर उपनिबंधकांनी घोषित केले. यावेळी टाळ्यांचा जोरदार कडकडाट होऊन  मालपाणी आणि नावंदर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. व्यासपीठावर मावळते चेअरमन राजेंद्र वाकचौरे मावळते व्हाईस चेअरमन मुकेश कोठारी यांच्यासह प्रकाश राठी,  संतोष करवा,  प्रकाश  कलंत्री, संदीप  जाजू, महेश डंग,  सम्राट भंडारी, वैभव दिवेकर,  जुगलकिशोर बाहेती, रविंद्र रत्नाकर पवार, शाम भडांगे, उषा नावंदर, किर्ती करवा, सीए श्री. प्रविण दिड्डी, 
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारीसंतोष विजय देसाई, उपसरव्यवस्थापक विजय बजाज, सहाय्यक सरव्यवस्थापक विठ्ठल कुलकर्णी आदींसह संगमनेर मधील विविध सहकारी पतसंस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संगमनेर मर्चंट बँकेचे सभासद व हितचिंतक उपस्थित होते. 
" अनेक वर्षांपासून संचालक मंडळ एक दिलाने एक विचाराने पारदर्शक कारभार करीत असल्यामुळे सर्वदृष्टीने संगमनेर मर्चंट बँक आर्थिक दृष्ट्या अत्यंत भक्कम स्थितीमध्ये आहे विशेष म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया ने नेट बँकिंग सुविधा प्राप्त होण्यासाठी ठेवलेला पन्नास  कोटींच्या पात्रतेचा निकष देखील संगमनेर मर्चंट बँकेने साध्य केला असून सुमारे ५२  कोटींहून अधिक नेटवर्थ निर्माण करून नेट बँकिंगच्या क्षेत्रात पदार्पण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. संचालक मंडळाने  अत्यंत विश्वासाने मला चेअरमन पदावर काम करण्याची पाचव्यांदा संधी दिली आहे. बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांमध्ये देखील ही संधी मला मिळाली आणि यंदाचे वर्ष हीरक महोत्सवी वर्ष असल्याने मनातील अनेक संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकमताने पुन्हा एकदा चेअरमन पदाची जबाबदारी माझ्याकडे सोपविली  आहे. भक्कम आर्थिक परिस्थितीसह अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे ग्राहकाभिमुख वेगवान आणि तत्पर सेवा यामुळे संस्थेचे भविष्य नक्कीच उज्वल आहे. बँकेचे संस्थापक स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी आणि त्यांच्या सहकारी धुरिणांनी  दाखविलेल्या काटकसरीच्या आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर वाटचाल करीत असल्यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे”  असे श्री राजेश मालपाणी म्हणाले.
नवनियुक्त व्हाईस चेअरमन मधुसूदन नावंदर यांनीही एकमताने आपल्याकडे सर्वांनी जबाबदारी सोपविल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी  प्रकाश राठी, ओंकारनाथ भंडारी, जसपाल डंग,राजू बिहाणी,  राजेश करवा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासट, महेश नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सीए कैलास सोमाणी, सामाजिक कार्यकर्त्या किरणताई झंवर, सहकार खात्यातील सेवानिवृत्त विभागीय आयुक्त आर.सी. शहा यांची यावेळी अभिनंदनपर भाषणे झाली. 
शहरातील अनेक आर्थिक संस्था तसेच सेवाभावी संस्था आणि नागरिकांच्या वतीने मालपाणी आणि नावंदर यांचा सत्कार करण्यात आला. मावळते चेअरमन राजेंद्र वाकचौरे आणि मावळते व्हाईस चेअरमन मुकेश कोठारी यांनीही आपल्याला वर्षभराच्या कारकिर्दीत सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष करवा यांनी तर आभार प्रदर्शन मधुसूदन नावंदर यांनी केले.