दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे...!
धुळीने नागरिक त्रस्त; नगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष
प्रतिनिधी) संगमनेर (तालुका शहरा-तील रस्त्यांची गेल्या काही महिन्यांपासून अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे असून धुळीमुळे छोट्या-मोठ्या वाहनचालकांसह पादचारीही अक्षरशः वैतागले आहेत. परंतु, याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.
शहरातील नवीन रोड, ओंकारनाथ मालपाणी रस्ता, शिवाजी नगर, लिंकरोड, मेनरोड, बाजारपेठ, चावडी, बायपास आदी रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून छोटे-मोठे खड्डेच खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना वाहने चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे हकवायच्या नाद नगरात अपघातही होण्याची भीती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी रस्त्यांसह भूमिगत गटारीची देखील कामे सुरू आहे. त्यासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आ-हेत. यामुळे रस्त्यांची अक्षरशः वाट लागली असून शहरामध्ये धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांवरील खड्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. परंतु, याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. वास्तविक पाहता संगमनेर शहराची राज्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
मात्र असे असताना गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तर दुसरीकडे वारंवार शहरा-तील रस्ते खोदले जात आहेत. याचा त्रास वाहनचालक, पाद-चारी, छोटे-मोठे व्यावसायिक यांना होत आहे. पावसाळ्यात आ तर याच खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते. त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांसह पादचाऱ्यांनी केली आहे. यामुळे आता नगरपालिकेकडून किती दिवसांत खड्डे बुजवले जाणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.