दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
बक्षीस रकमेतून विविध विकास कामे मार्गी लागणार
संगमनेर ( प्रतिनिधी ) मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रगतशील व वैभवशाली असलेले संगमनेर शहर हे राज्यातील विकसित शहर म्हणून ओळखले जात आहे. सौ.दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने केलेल्या विविध पर्यावरण पूरक व स्वच्छता कामांमुळे माझी वसुंधरा अभियानांतर्गत 1.5 कोटींचा निधी मंजूर झाला असून या अंतर्गत विविध पर्यावरण पूरक विकास कामे मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत पर्यावरणीय कामाबद्दल संगमनेर नगर परिषदेला 1.5 कोटींचे बक्षीस मिळाले आहे. या बक्षीस रकमेतून विविध विकासकामे मार्गी लावता येणार आहेत. तत्कालीन नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांनी स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर हरित संगमनेर ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवताना संगमनेर शहरातील नागरिकांच्या सहकार्यातून स्वच्छ संगमनेर व सुंदर संगमनेर बनवले. लोकनेते बाळासाहेब थोरात मा.आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून विविध विकासाच्या योजना मार्गी लागल्या.
नगरपरिषदेच्या चांगल्या कामाची दखल घेऊन राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार नगर परिषदेला मिळाले आहेत. याचबरोबर माझी वसुंधरा 4.0 या योजनेतून मिळालेल्या बक्षीस रकमेतून शहरात पर्यावरण पूरक प्रकल्प हरितपट्टा, विकास घनकचरा व्यवस्थापन,जलसंवर्धन यासारखी विकास कामे हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये हनुमान मंदिर, सावित्रीबाई फुले गार्डन, चैतन्य नगर गार्डन, गोविंद नगर,अकोले बायपास,श्रमपरिहार सोसायटी, नेहरू गार्डन, पुनर्वसन कॉलनी, राजापूर रोड,अकोले बायपास,सुयोग कॉलनी,संत गाडगेबाबा गार्डन,ऑरेंज कॉर्नर,दुर्गा गार्डन, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल, अभिनव नगर या ठिकाणी वृक्षारोपण व गार्डन विकास अभियान राबविण्यात येणार आहे. तर कोर्टाच्या मागे, घोडेकर मळा,पुनर्वसन कॉलनी, जिजामाता रोड, पावबाकी रोड व इतर ठिकाणी मियावाकी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
तसेच कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे ऑन ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या निधी अंतर्गत पर्यावरण विषयक माहिती व जनजागृती अभियान सुद्धा शहरात राबविण्यात येणार आहेत.
लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेने केलेल्या सातत्याने पर्यावरण पूरक व संवर्धन कामाबद्दल मिळालेल्या या बक्षीस निधीतून इतर कामे मार्गे लागणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट