विकासासाठी निधी आणण्यात आमची पीएचडी - आ. सत्यजीत तांबे     |      संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना शहरवासी यांचा मोठा पाठिंबा     |      म्हाळुंगी पुलाच्या बदनामीवरून आ.तांबे यांचा सेनेच्या शहर प्रमुखाविरोधात पोलिसात तक्रार अर्ज     |      खा. श्रीकांत शिंदे यांचा संगमनेरात फ्लॉप शो     |      शांत संयमी मा.आ.डॉ.सुधीर तांबे कडाडले     |      संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध राहून शहरवासीयांचा विकास सार्थ ठरवणार - डॉ.मैथिलीताई तांबे     |      सोमवारी सेवा समितीची प्रचार यात्रा व जाहीर सभा......     |      शहरातील शांतता व एकतेसाठी सेवा समितीच्या पाठीशी उभे रहा - भाईजान     |      संगमनेरच्या तीन प्रभागातील निवडणुकीला स्थगिती ?     |      एकनाथ शिंदेंचा लाडका आमदार अमोल खताळ अडचणीत; निवडणुकीच्या तोंडावरच 'ती' ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल     |     
नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वडेट्टीवार यांचे आक्षेपार्ह विधान संगमनेरमध्ये निषेध मोर्चा By Admin 2025-02-26

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वडेट्टीवार यांचे आक्षेपार्ह विधान संगमनेरमध्ये निषेध मोर्चा

संगमनेर हिंदू धर्माचे धर्मगुरू नाणिजधामचे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्याबद्दल काँग्रेस नेते तथा माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या अपमानास्पद विधानाच्या निषेधार्थ संगमनेरात श्री संप्रदायाकडून वडेट्टीवारांचा तीव्र निषेध करण्यात आला. नरेंद्रचार्य महाराजांच्या भक्तगणांनी वडेट्टीवारांच्या फोटोला जोडे मारून संताप व्यक्त करत वडेट्टीवारांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. विधानसभा निवडणुकीत संघ

आणि संघ प्रणित साधू संत यांनी हिंदुत्व वाचविण्यासाठी जनजागरण केले. साधू-संत पाठीशी असल्यामुळे महायुतीचा विजय झाला. नरेंद्राचार्य महाराज यांचेही सहकार्य लाभले असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात

 व्यक्त केले. या वक्तव्यामुळे आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर टीका करताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराजांचा एकेरी उल्लेख करीत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे नरेंद्राचार्य महाराजांचे शिष्य आणि अनुयायी आक्रमक झाले आहेत. श्री संप्रदायाच्या वतीने सोमवारी राज्यभरात विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात आंदोलन पुकारले गेले होते. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर आणि तालुक्यातील श्री संप्रदायाच्या अनुयायांनी जिल्ह्याचे निरीक्षक दादासाहेब मते, जिल्हाध्यक्ष सयाजी भडांगे आणि तालुकाप्रमुख प्रकाश बेलापूरकर यांच्या नेतृत्वात जाणता राजा मैदानावरून निषेध मोर्चा काढला. या मोर्चात महाराजांच्या अनुयायांनी हातात निषेधाचे फलक घेत वडेट्टीवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा नवीननगर रोडवरून संगमनेर बस स्थानकात पोहोचला तेथे नरेंद्रचार्य महाराजांच्या अनुयायांनी वडेट्टीवारांच्या फोटोला जोडे मारले. तसेच विजय वडेट्टीवार यांनी माफी मागावी, अशी मागणी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शिष्य आणि अनुयायांनी केली आहे. यावेळी निरीक्षक दादासाहेब मते, जिल्हाध्यक्ष सयाजी भडांगे, ज्ञानेश्वर करपे यांची भाषणे झाली. यावेळी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.







Special Offer Ad