शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |      दिल्लीतील 1500 वर्षे जुने प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ पाडण्याच्या कारवाईविरोधात संताप संगमनेर येथील भक्तांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी     |     
सोमवारी सेवा समितीची प्रचार यात्रा व जाहीर सभा...... By Admin 2025-11-30

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांची उपस्थिती

संगमनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे विकासातून राज्यात अग्रगण्य ठरले आहे. संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ  सोमवार दि. 1  डिसेंबर  2025

दुपारी 3.00 वा भव्य प्रचार रॅली व 5 वा. जाहीर सभा होणार असून यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजीत तांबे उपस्थित राहणार आहेत

संगमनेर सेवा समिती च्या वतीने 20 नवीन उमेदवार व 11 अनुभवी चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून संगमनेर 2.0 या व्हिजनसह निवडणूक लढत असलेल्या या समितीला संगमनेर मधील तमाम नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. विविध प्रभागांमधून या समितीच्या उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ  सोमवार दि. 1  डिसेंबर  2025  दु.3 वाजता लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात ,डॉ मैथिलीताई तांबे यांच्या उपस्थितीमध्ये युवकांची भव्य रॅली  होणार आहे ही रॅली

जाणता राजा मैदान येथून सुरू होणार असून राजपाल चौक - बस स्टॅन्ड - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - अशोक चौक - चावडी - मेन रोड - गवंडीपुरा - सय्यद बाबा चौक - तेलीखुंट - बाजारपेठ - संगमनेर नगरपरिषद - लालबहादूर शास्त्री चौक येथे पोहोचणार आहे तर लालबहादूर शास्त्री चौक येथे 5 वाजता भव्य जाहीर सभा होणार आहे.

      तरी या जाहीर सभेसाठी संगमनेर मधील सर्व युवक नागरिक महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे







Special Offer Ad