संगमनेरची कन्या हर्षदा नाईक गायकवाड हिने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राजस्थानच्या आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग स्पर्धेत तब्बल १५० मॉडेल्समधून “Miss Rajasthan Model of the Year 2026” हा मानाचा किताब पटकावला. हा क्षण संपूर्ण संगमनेरसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
यापूर्वीही हर्षा नाईक हिने “Miss Maharashtra Model of the Year 2023” हा किताब मिळवून संगमनेरचे नाव राज्यभरात उज्ज्वल केले होते. आज पुन्हा एकदा आपल्या उल्लेखनीय यशाने तिने संगमनेरचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.
हर्षाच्या या यशामुळे संगमनेरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
संगमनेरकरांना तुझा नेहमीच अभिमान राहील, हर्षदा! 
आयोजकांच्या मते, मॉडेलिंग क्षेत्राला नवी ओळख मिळवून देणे तसेच प्रतिभावान मॉडेल्सना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
या सोहळ्याला ऑल इंडिया फॅशन असोसिएशनचे संस्थापक चार्ल्स विल्यम्स तसेच सुपरस्टार अब्दुल ख़ासिम बजानिया यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे या आयोजनाची शोभा आणखी वाढली.
या कार्यक्रमाचे आयोजन रॉयल पेजेंट यांच्या वतीने, तर सादरीकरण हिंदुस्तान बियर्ड क्लब यांच्या वतीने करण्यात आले.