शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |      दिल्लीतील 1500 वर्षे जुने प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ पाडण्याच्या कारवाईविरोधात संताप संगमनेर येथील भक्तांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी     |     
एकनाथ शिंदेंचा लाडका आमदार अमोल खताळ अडचणीत; निवडणुकीच्या तोंडावरच 'ती' ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल By Admin 2025-11-29

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




एकनाथ शिंदेंचा लाडका आमदार अमोल खताळ अडचणीत; निवडणुकीच्या तोंडावरच 'ती' ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल

संगमनेर : काँग्रेसचे बाहुबली नेते, महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्रिपदाचे दावेदार राहिलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा धक्का दिल्यानंतर कितीही नाही म्हटलं, तरी संगमनेरचे शिवसेनेचे( Shivsena MLA) आमदार अमोल खताळ यांचा 'कॉन्फिडन्स' भलताच वाढला आहे.

त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेत राजकारण तापवण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता खताळ यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सध्या राज्यात मोठी धामधूम सुरू आहे. त्यामुळे कुरघोडी, फोडाफोडी यांच्यासह आरोप-प्रत्यारोपांनी महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पेटलं आहे. याचदरम्यान, आता शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरचे आमदार अमोल खताळ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये व्यापाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचं दिसून येत आहे.

आमदार खताळ यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीच्या तयारीत असलेल्या आमदारांनी आपलाच कार्यकर्ता तिथं असावा, यासाठी संगमनेर आणि अकोले तालुक्यात जोरदार प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे.पण एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) हा शिलेदार अडचणीत आला आहे.

आमदार अमोल खताळ यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अरे तू कोण बोलतोय म्हणतो म्हणजे तू लई शहाणा दिसतोय रे.. तुला सांगुनही तू लई शहाणा झाला का हरामखोर.. तू शहाणपणा करतो का रे जास्त.. तुझा मालक कोण आहे?, त्याला मला फोन करायला लाव मला.. नाहीतर उद्या बंद करून टाकतो तुझं शोरुम.. एवढा शहाणा आहे का तू, का रे?…तुला सांगितलं तरी तू मला विचारतो कोण बोलतो?.. थांब तुझ्याकडे पहातो उद्या.. माजला काय जास्त तू?…या शिवराळ भाषा वापरल्याचं या क्लिपमध्ये दिसून येत आहे.

Special Offer Ad