शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |      दिल्लीतील 1500 वर्षे जुने प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ पाडण्याच्या कारवाईविरोधात संताप संगमनेर येथील भक्तांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी     |     
संगमनेर साठी महत्त्वाची नाशिक पुणे रेल्वे बाहेरून कशी चालली ते सांगा By Admin 2025-11-28

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




मागील एक वर्षात शहरात नको ते घडते आहे

संगमनेर ( प्रतिनिधी) -- संगमनेर शहराला निळवंडेतून थेट पाईपलाईन द्वारे स्वच्छ पाणी मिळते आहे. शहरात विकासाच्या योजना राबविल्या आहेत. शांतता, सुव्यवस्था यामागे कुणाचे तरी कष्ट आहे . हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. आपण शहर जपले. मात्र मागील एक वर्षांमध्ये शहरांमध्ये अस्वस्थता वाढली असून अमली पदार्थांची तस्करी व दहशत वाढली आहे. हे थोपवण्याची जबाबदारी जनतेची असून संगमनेर साठी महत्त्वाची असणारी नाशिक पुणे रेल्वे दुसऱ्या तालुक्यात मधून जाती कसे हे पहिले सांगा असा सवाल महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

जनता नगर मध्ये संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, उमेदवार विश्वासराव मुर्तडक, डॉ अनुराधा सातपुते, सोमेश्वर दिवटे, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे डॉ किशोर पवार, बाळकृष्ण महाराज करपे, प्रा हिरालाल पगडाल ज्ञानेश्वर राक्षे, अमित सोनवणे, गिरीश गोरे, तुषार वनवे, वैष्णव मूर्तडक, सौ रुपाली मिलिंद आवटी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, इंजिनिअरिंग कॉलेज ते बस स्थानक हा अद्यावत रस्ता आपण पूर्ण केला. याचबरोबर शहरासाठी थेट पाईपलाईन योजना राबवली. याकरता अनेकदा शेतकऱ्यांच्या विनवण्या कराव्या लागला. सातत्याने निधी मिळवला. आज स्वच्छ पाणी मिळते आहे यामागे कोणाचे तरी कष्ट आहे. तीस वर्षांमध्ये नगरपालिका अत्यंत आदर्श पद्धतीने चालवली .विकासाचे मोठमोठी कामे केली .शहरात शांतता सुव्यवस्था, वैभव निर्माण केले.

 मात्र मागील एक वर्षापासून संगमनेर मध्ये अशांतता आहे .अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. धर्माच्या नावावर काळे धंदे सुरू आहेत. मागील आठवड्यामध्ये एका तरुणाचा हात तुटला. हात तुटलेला तरुण आणि तोडणारा कोण होता हे तपासले पाहिजे .शहरांमध्ये ड्रग्स, इंजेक्शन, नशील्या गोळ्या उपलब्ध होत आहे. आणि आम्ही पदार्थांचा माफिया बस स्थानकासमोर सभेमध्ये मोरक्या होतो आहे. बाहेरची प्रवृत्ती आपल्याला संगमनेर मध्ये येऊ द्यायची नसून सर्वांनी आपले संगमनेर वाचवण्यासाठी एकत्र राहणे गरजेचे आहे.

 याचबरोबर नाशिक पुणे रेल्वे साठी आपण सातत्याने पाठपुरावा केला पोखरी हवेली येथे रेल्वे स्टेशन साठी जागा नियोजित केली. सर्व नियोजित असताना आता ही महत्त्वाची रेल्वे बाहेरून जाते कशी हे पहिले सांगा असे आवाहन त्यांनी केले.

Special Offer Ad