कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |      दिल्लीतील 1500 वर्षे जुने प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ पाडण्याच्या कारवाईविरोधात संताप संगमनेर येथील भक्तांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी     |      सीबीएससी पॅटर्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 68 शब्दांमध्ये हे अत्यंत खेदजनक     |      संगमनेर दोन प्रभागात तिघांची माघार पालिका निवडणुकीसाठी तीन प्रभागात एका जागेसाठी नऊ उमेदवार रणांगणात     |      पुणे-नाशिक' रेल्वेवरुन जनआंदोलन पेटतंय     |     
कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान By Admin 2025-12-20

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान

संगमनेर: संगमनेरयेथील १५ प्रभागांतील २७ नगरसेवकपदांसह नगराध्यक्षपदासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे.नगरसेवकपदाच्या ३ जागांसाठी आज मतदान झाले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत नगरसेवकपदापेक्षा नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागून आहे.

रविवारी (20 डिसेंबर 2025) मतमोजणी होणार असून, संगमनेरचा नगराध्यक्ष कोण, याचा फैसला होणार आहे. निकाल काही तासांवर आल्याने सध्या सर्वच उमेदवारांची धडधड वाढली आहे. संगमनेरमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेना महायुतीकडून आमदार अमोल खताळ यांच्या वहिनी सुवर्णा खताळ, तर विरोधी संगमनेर सेवा समितीकडून आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली यांच्यातच दुरंगी लढत आहे. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार खताळ आणि आमदार तांबे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

यामध्ये मुस्लिमबहुल भागात सर्वाधिक मतदान झाले आहे. मतदानाचा हा टक्का किती प्रभावी ठरतो, यावरच उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. नगरसेवकपदाच्या निवडणुकीतही राजकीय समीकरणे गुंतागुंतीची ठरली आहेत. संगमनेर सेवा समिती, भाजप-शिवसेना महायुती यांच्यासह राज्याच्या राजकारणात महायुतीचा घटकपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), स्वतंत्रपणे आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काही प्रभागांत तिरंगी, काही ठिकाणी चौरंगी, तर काही ठिकाणी बहुरंगी लढती पाहायला मिळाल्या. यात मतांचे विभाजन कोणाच्या फायद्याचे आणि कोणाच्या तोट्याचे ठरणार, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

नगरपरिषदेची रणधुमाळी संपल्यानंतर अवघ्या एक ते दीड महिन्यातच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे नगरपालिकेचा निकाल त्या निवडणुकीसाठी उपांत्य सामना मानला जात आहे. येथे मिळणारी आघाडी किंवा पिछाडी राजकीय दिशा ठरवणारी ठरू शकते. त्यामुळे भविष्यातील संगमनेरचा खरा किंगमेकर कोण ठरणार, हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल.

प्रभाग एक, दोन, तीन-ब साठी विरोधी उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे तेथील स्थगित केलेले मतदान आज झाले आहे आहे. शिवसेनेचे अभिजित ऊर्फ मुन्ना पुंड, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, इंदिरा नामन, अर्चना दिघे, तसेच अपक्ष दोन उमेदवाराचे राजकीय भवितव्य कसे असेल हे उद्या समजेल









Special Offer Ad