शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |      दिल्लीतील 1500 वर्षे जुने प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ पाडण्याच्या कारवाईविरोधात संताप संगमनेर येथील भक्तांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी     |     
संगमनेर सेवा समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी जाहीरनामा By Admin 2025-11-28

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत आशीर्वाद पतसंस्थे समोर जाहीर सभा

संगमनेर (प्रतिनिधी)--संगमनेर शहरातील सर्व नागरिकांनी राजकारण विरहित एकत्र येऊन स्थापन केलेल्या संगमनेर सेवा समितीच्या वतीने व्हिजन 2.0 हा जाहीरनामा शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वा. आशीर्वाद पतसंस्था समोर महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रसिद्ध होणार असून यावेळी जाहीर सभा होणार आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे विकासातून वैभवशाली ठरले आहे. विकासाची ही परंपरा कायम ठेवण्याबरोबर मागील एक वर्षापासून संगमनेर अशांत करणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी संगमनेर मधील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन राजकारण विरहित संगमनेर सेवा समिती स्थापन केली आहे.  संगमनेर 2.0 अंतर्गत पुढील पाच वर्षाची नियोजन घेऊन संगमनेर मधील 11257 नागरिकांच्या सूचना घेऊन आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेर 2.0 हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे.

शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी आशीर्वाद पतसंस्थे समोर  सायंकाळी 5 वा. जनतेचा जाहीरनामा प्रसिद्धी व जाहीर सभेसाठी महाराष्ट्राचे लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, डॉ जयश्रीताई थोरात यांच्यासह संगमनेर सेवा समिती, सर्व संघटना बिगर राजकीय पदाधिकारी, सर्व सदस्य व उमेदवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी जनतेच्या जाहीरनामा प्रसिद्धी व जाहीर सभेसाठी  संगमनेर शहरातील सर्व नागरिक ,युवक, महिला, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे



Special Offer Ad