शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |      दिल्लीतील 1500 वर्षे जुने प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ पाडण्याच्या कारवाईविरोधात संताप संगमनेर येथील भक्तांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी     |     
संगमनेर सेवा समितीच्या सभेला जागा नाकारल्या; प्रशासनावर दबाव By Admin 2025-11-28

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा, संगमनेर सेवा समितीचा हल्लाबोल

संगमनेर : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर सेवा समितीच्या जाहीर सभांना प्रशासनाकडून जागा नाकारल्याने वातावरण तापले आहे. नवीन नगर रोड येथे सभेसाठी समितीने परवानगी मागितली होती, मात्र प्रशासनाने नकार दिला.

याच ठिकाणी 27 नोव्हेंबरला महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. मात्र 27, 28 नोव्हेंबरसह पुढील काही तारखा महायुतीकडून जाणीवपूर्वक ब्लॉक केल्याची चर्चा शहरात जोरात आहे. विशेष म्हणजे 28 नोव्हेंबरला नवीन नगर रोड येथे महायुतीची कोणतीही सभा नसतानाही ती जागा रोखून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे संगमनेर सेवा समितीला मैदान मिळू नये हा हेतू स्पष्ट दिसत असल्याची चर्चा नागरिकांत आहे.

सेवा समितीने प्रशासनाला विनंती केली होती की, 28 तारखेला जागा रिकामी असल्यास सभा घेण्याची परवानगी द्यावी. मात्र प्रशासनाने महायुतीकडून जागा मिळणार नसल्याचे सांगितले.

या घडामोडींमुळे प्रशासनावर प्रचंड दबाव आहे, असे स्पष्ट होत असून, निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष रितीने घेण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जागा मुद्दाम रोखून निवडणूक वातावरण दूषित करण्याचा हा प्रयत्न असल्याची नाराजी शहरात व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया देताना माजी उपनगराध्यक्ष किशोर पवार म्हणाले, “संगमनेर सेवा समितीला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सभेची जागा अडवून जनता थांबेल असे त्यांना वाटते. पण जनतेच्या मनात असलेली आमची जागा कुणीही अडवू शकत नाही. संगमनेरमध्ये अशा प्रकारची राजकीय दडपशाही कधीच नव्हती. याला जनता योग्य उत्तर देईल.”

Special Offer Ad