दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर पुन्हा अमली पदार्थांची विक्री
संगमनेर प्रतिनिधी दि. 5
गर्द, हेरॉईन सारख्या घातक अमली पदार्थाची विक्री करण्याचा अड्डा असलेल्या मालदाड रोडवर पुन्हा अमली पदार्थाची तस्करी आढळून आली असून गांजा बाळगणाऱ्याला आणि विक्री करणाऱ्याला संगमनेर शहर पोलिसांनी पकडले आहे. यावरून मालदाड रोडवर पुन्हा अमली पदार्थ विक्रेत्यांनी डोके वर काढलेले दिसत असून मागील कारवाई कुठलेही ठोस परिणाम न निघल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दलही साशंकता व्यक्त होऊ लागली आहे.
सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यांमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक वर असणाऱ्या संगमनेर मध्ये अमली पदार्थ विक्रीचे उद्योग पुन्हा उघडकीस आली आहेत. पोलिसांनी मालदाड रोडवर छापा टाकून काही काळापूर्वी थेट हेरॉईन, गर्द असे अमली पदार्थ पकडले होते. त्या गुन्ह्यात पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नाही की पोलिसांनी तपास आरोपींच्या सोयीप्रमाणे केला हा देखील संशोधनाचा भाग आहे. या सर्वच अमली पदार्थ विक्रेत्यांना नगर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह संगमनेर पर्यंत छुपे संरक्षण दिले जात असल्याचे बोलले जात आह
संगमनेर शहर पोलिसांनी नुकतीच कारवाई करून मालदार रोड परिसरात गांजा बाळगणारा आणि विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल केला आहे. अंबादास शांताराम शिंदे (वय 40 वर्षे, राहणारे शिवाजीनगर, मालदार रोड संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल करून अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
संगमनेर शहरामध्ये पान टपऱ्यांमधून अवैध गुटख्याबरोबरच अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. ही कारवाई देखील मालदाड रोडवरील शिवशंभो पान सेंटर अँड कटलरी सेंटर या पान टपरी मध्ये करण्यात आली आहे. 6750 रुपये किमतीचा 750 ग्रॅम गांजा या प्रकरणात पकडण्यात आला असून सदर व्यक्ती ही त्याची विक्री करत असल्याचेही नोंद करण्यात आली आहे. आता या गुन्ह्यात देखील पोलीस काय तपास करतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.