संगमनेर मध्ये श्रीराम कथेचे आयोजन ; मालपाणी लॉन्स मध्ये चालणार नऊ दिवस धार्मिक उत्सव     |      काकडवाडीच्या महालक्ष्मी मंदिरातील सोने अन् ऐवज चोरणारी टोळी जेरबंद, सापळा रचला अन् असं केलं जेरबंद     |      पुणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार     |      दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याचा प्रशासनाचा निर्णय  ?     |      संगमनेरातील अतिक्रमणांवर पुन्हा जेसीबी!     |      संगमनेर शहरात शिवजयंती उत्सव वादावर तोडगा काढण्याचे काम सुरू     |     
संगमनेरातील अतिक्रमणांवर पुन्हा जेसीबी! By Admin 2025-03-12

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेरातील अतिक्रमणांवर पुन्हा जेसीबी!

संगमनेर : संगमनेर नगरपालिकेने काही दिवस थंडावलेली अतिक्रमण हटाव मोहीम मंगळवारी पुन्हा पुर्ववत सुरू केली आहे. दिल्ली नाका परिसरातील उर्वरित अतिक्रमनांवर पोलिस बंदोबस्तात जेसीबी फिरविण्यात आला, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली.संगमनेर नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासनाने महिन्यापूर्वी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती. यानंतर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होणार होते, मात्र बरेच दिवस झाले तरी, काम झाले नाही. परिणामी काही नागरिकांनी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण केले. यामुळे अतिक्रमण हटाव मोहीमेचा काही उपयोग झाला नाही.दिल्ली नाका परिसरात कुरण रोड कडे जाणार्‍या वळणावरील अतिक्रमणे काढल्यानंतर राहिलेले अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेवर नागरिकांनी दबाव आणला होता. अखेर याची दखल घेत, अतिक्रमण हटाव मोहिमेतील अधिकारी व कर्मचार्‍यांनी मंगळवारी सकाळीच पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरुवात केली.
कुरणे रोडकडे जाणार्‍या रस्त्यावरील अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी करुन, सुरुवातीला हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी आक्रमक पावित्रा घेत, प्रतिबंध करणार्‍यांना हटविले.
अखेर दिल्ली नाक्याने घेतला मोकळा श्वास!
अतिक्रमण हटाव मोहिम सुरु असताना हा रस्ता रहदारीचा असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. अतिक्रमण काढल्यानंतर दिल्ली नाका चौफुलीने अखेर मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसत आहे.
- रामदास कोकरे, संगमनेर पालिकेचे मुख्याधिकारी.'संगमनेरातील दिल्ली नाका परिसरातील कुरणगावाकडे जाणार्‍या वळणावरील अतिक्रमणे पालिकेच्या पथकातील कर्मचार्‍यांनी पाडली. मंगळवारी दिवसभर ही कारवाई सुरूच होती. या अगोदर अतिक्रमणे काढली होती, मात्र उर्वरित ठराविक अतिक्रमणेही हटविली आहेत.