फ्लायओव्हरचे काम नागरिकांनी बंद पाडले, सर्व्हिस रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी     |      गटार साफसफाई करताना दोघांचा मृत्यू     |      गटार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी--आमदार सत्यजित तांबे     |      चंदनापुरी घाटात स्कूल बस पलटी, विद्यार्थी जखमी; वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह     |      संगमनेर पंचायत समितीत थोरात-विखे समर्थक एकमेकांना भिडले, जोरदार घोषणाबाजी करत आरोप-प्रत्यारोप; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात     |      तर स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहन करू !     |      म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेच्या सेवेसाठी खुला     |      संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च     |      प्रवरानदी पात्रात वाळू चोरी करताना तस्कराला रंगेहात पकडले ! सहा जणांवर गुन्हा दाखल     |      अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी     |     
अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी By Admin 2025-06-12

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




प्रशासकीय वर्तुळात उंडे यांच्या नियुक्तीचे स्वागत केले जात आहे. त्यांच्या अनुभवाचा संगमनेरच्या विकासासाठी निश्चितच फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

अहिल्यानगर येथे विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांची संगमनेर येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय कारणास्तव ही बदली केली असून नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले असून, उंडे यांना तातडीने आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे.

 

गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरचे प्रांताधिकारी पद रिक्त होते. यापूर्वीचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांची बढतीवर अपर जिल्हाधिकारी म्हणून अहिल्यानगर येथे बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. तेव्हापासून या जागेसाठी अनेक चर्चा सुरू होत्या, विशेषतः महसूल प्रशासनातील अधिकारी संगमनेरला येण्यास फारसे उत्सुक नसल्याची चर्चा होती. अरुण उंडे यांच्या नियुक्तीमुळे आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.प्रशासकीय वर्तुळात उंडे यांच्या नियुक्तीचे स्वागत केले जात आहे. त्यांच्या अनुभवाचा संगमनेर-अकोलेच्या विकासासाठी निश्चितच फायदा होईल अशी अपेक्षा आहे. असे असले तरी, संगमनेरमधील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या जागा अजूनही रिक्त असून, गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाने या जागांवर नियुक्त्या केलेल्या नाहीत. या रिक्त पदांवरही लवकरच अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.