फ्लायओव्हरचे काम नागरिकांनी बंद पाडले, सर्व्हिस रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी     |      गटार साफसफाई करताना दोघांचा मृत्यू     |      गटार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी--आमदार सत्यजित तांबे     |      चंदनापुरी घाटात स्कूल बस पलटी, विद्यार्थी जखमी; वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह     |      संगमनेर पंचायत समितीत थोरात-विखे समर्थक एकमेकांना भिडले, जोरदार घोषणाबाजी करत आरोप-प्रत्यारोप; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात     |      तर स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहन करू !     |      म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेच्या सेवेसाठी खुला     |      संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च     |      प्रवरानदी पात्रात वाळू चोरी करताना तस्कराला रंगेहात पकडले ! सहा जणांवर गुन्हा दाखल     |      अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी     |     
नाशिक-पुणे महामार्गावर अपघातः आयशर टेम्पो आणि बस यांच्यात धडक; एक गंभीर जखमी By Admin 2025-06-11

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




भारती यांनी अपघातानंतर तातडीने ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी, संगमनेर येथे आणि त्यानंतर वाय.सी.एम. हॉस्पिटल भोसरी, पुणे येथे उपचार घेतले.

संगमनेर, प्रतिनिधी

नाशिक-पुणे महामार्गावर अमृतवाहिनी कॉलेजजवळ आयशर टेम्पो आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतवाहिनी कॉलेज जवळ गुंजाळ शॉपीसमोर २३ मे रोजी पहाटे ४

वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. या संदर्भात मंगळवारी अवधुत धोंडीबुवा भारती (वय ३५, रा. जाधववाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. हिप्परगा, पोस्ट हाडोली बी.एस., ता. कंधार, जि. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते २३ मे रोजी पहाटे ४ वाजता आपला आयशर टेम्पो (क्र. एमएच ०५ डीके १६२५) घेऊन नाशिक-पुणे रोडने जात होते. त्यावेळी अमृतवाहिनी कॉलेजजवळ गुंजाळ शॉपीसमोर प्रभू तुकाराम लोखंडे (वय ५४, रा. कावलगाव, ता. पूर्णा, जि. परभणी, सध्या रा. तळेगाव माळेवाडी, जि. पुणे) यांनी त्यांच्या ताब्यातील बस (क्र. एमएच ०९ एफएल ००७) हयगयीने आणि भरधाव वेगात राँग साईडने चालवून फिर्यादीच्या टेम्पोला समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात अवधुत भारती यांना गंभीर दुखापत झाली असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अपघातावेळी फिर्यादीचा मोबाईलही कुठेतरी पडून गहाळ झाला आहे. अवधुत भारती यांनी अपघातानंतर तातडीने ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी, संगमनेर येथे आणि त्यानंतर वाय.सी.एम. हॉस्पिटल भोसरी, पुणे येथे उपचार घेतले. उपचारानंतर त्यांनी १० जून रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. अपघातानंतर औषधोपचार घेत असल्याने फिर्याद देण्यास विलंब झाल्याचे कारण त्यांनी सांगितले.संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुरनं ५३६/२०२५ भादंवि कलम २७९, ३३८, ४२७, सह कलम १८४ मोटर वाहन अधिनियम प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गवळी हे करत आहेत.