दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
५ डिसेंबर २०२४ ते १५ एप्रिल २०२५ या कालावधीत आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केला.
संगमनेर, प्रतिनिधी
संगमनेरमध्ये एक अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली असून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून दोनदा बलात्कार केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी आदित्य अर्जुन शेटे या आरोपी विरोधात बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकारी विकास काळे पुढील तपास करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी संगमनेर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात जात असताना बसस्थानकावर तिची ओळख आरोपी तरुणासोबत झाली. आरोपीने तिच्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या घरी बोलावले. ५ डिसेंबर २०२४ ते १५ एप्रिल २०२५ या कालावधीत आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केला.
या घटनेची माहिती मुलीच्या पालकांना मिळाल्यावर, तिने आरोपीसोबत लग्नाचे नियोजन करत असल्याचे सांगितले. दरम्यान, ३ जून २०२५ रोजी आरोपीने पीडित मुलीच्या वडिलांना फोन करून, बोलण्यास भाग पाडल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. यानंतर पीडित मुलीने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.
पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तात्काळ आरोपी आदित्य अर्जुन शेटे याच्या विरोधात भारतीय न्यायासहिता कायद्याअंतर्गत बलात्काराचा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचेसंरक्षण (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.