संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च     |      प्रवरानदी पात्रात वाळू चोरी करताना तस्कराला रंगेहात पकडले ! सहा जणांवर गुन्हा दाखल     |      अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी     |      सिंचनापासून वंचित राहिलेल्या सर्व गावांचे होणार सर्वेक्षण     |      अनिल शिंदे यांना बंधू शोक     |      संगमनेरमध्ये सराईतांच्या दोन टोळ्या पकडल्या! सात आरोपींना अटक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त     |      संगमनेरमध्ये गोवंश हत्यासत्र सुरूच; पोलीस, पालिका प्रशासनाबरोबरच 'हिंदुत्ववादी' आणि 'मुस्लिम' नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह     |      शरद पवारांचे ५० % लाडक्या बहिणींना तिकीट, स्थानिक स्वराज्य निवडणुकीआधी मोठी घोषणा....     |      नाशिक-पुणे महामार्गावर अपघातः आयशर टेम्पो आणि बस यांच्यात धडक; एक गंभीर जखमी     |      शेतात काय करता असे म्हणत बाप-लेकाला मारहाण ! पाच जणांवर गुन्हा दाखल     |     
श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांचे संगमनेरात उस्फुर्त स्वागत By Admin 2025-05-26

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांचे संगमनेरात उस्फुर्त स्वागत

संगमनेर - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमाचे सोमवारी संगमनेरत आगमन झाले. शहरातील चौहानपुरा येथील दैनिक आनंद भवनच्या प्रांगणात पालखीचे उत्स्फूर्तपणे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले, पालखी पादुका परिक्रमेचे हे 28 वे वर्ष आहे, यावेळी दैनिक आनंदचे संपादक श्री राजेन्द्रसिंह चौहान व त्यांच्या सुविद्ध पत्नी सौ शारदादेवी चौहान यांच्या हस्ते पालखीचे विधीवत पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी अक्कलकोटचे संजय गुरु यांनी महाअभिषेकाचे पौराहित्य केले, स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी स्वामी भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. याप्रसंगी किशोरजी कालडा, नामदेव कहांडळ, बाबा खरात सर, राकेश सिंह चौहान ,कुलदीप ठाकूर ,निलेश ठाकूर, आनंद चौहान, सुनील महाले, सुरेंद्र गवंडी तसेच सौ कविता चव्हाण, सौ सुचित्रा परदेशी, सौ ठाकूर, रश्मी व रियांश परदेशी आदींसह इतर भक्तगण उपस्थित होते, याप्रसंगी आनंद मिसाळ आशिष दुसरा व इतरांनी मोलाचे सहकार्य केले.