संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च     |      प्रवरानदी पात्रात वाळू चोरी करताना तस्कराला रंगेहात पकडले ! सहा जणांवर गुन्हा दाखल     |      अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी     |      सिंचनापासून वंचित राहिलेल्या सर्व गावांचे होणार सर्वेक्षण     |      अनिल शिंदे यांना बंधू शोक     |      संगमनेरमध्ये सराईतांच्या दोन टोळ्या पकडल्या! सात आरोपींना अटक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त     |      संगमनेरमध्ये गोवंश हत्यासत्र सुरूच; पोलीस, पालिका प्रशासनाबरोबरच 'हिंदुत्ववादी' आणि 'मुस्लिम' नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह     |      शरद पवारांचे ५० % लाडक्या बहिणींना तिकीट, स्थानिक स्वराज्य निवडणुकीआधी मोठी घोषणा....     |      नाशिक-पुणे महामार्गावर अपघातः आयशर टेम्पो आणि बस यांच्यात धडक; एक गंभीर जखमी     |      शेतात काय करता असे म्हणत बाप-लेकाला मारहाण ! पाच जणांवर गुन्हा दाखल     |     
अज्ञात इसमाने दोन चारचाकी वाहने पेटविली By Admin 2025-05-22

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




१० लाखांचे नुकसान ; घुलेवाडी येथील घटना

संगमनेर : अज्ञात इसमाने दोन
चारचाकी वाहनांना आग लावल्याची घटना तालुक्यातील घुलेवाडी येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीमध्ये सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, घुलेवाडी येथील अनिल गंगाधर राऊत हे व्यवसायाने चालक असून त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी दोन गाड्या घेतल्या होत्या. यामध्ये (एमएच ०८ आर ८८०४) ही टाटा विंगर गाडी त्यांनी राहुल बुरुडे यांच्याकडून एक महिन्यासाठी वापरासाठी घेतली होती. तर दुसरी (एमएच ०४ जीपी ३३३२) ही ट्रॅम्पो ट्रेव्हल्सची गाडी त्यांनी कोटक बँकेकडून घेतली होती.

सोमवारी (दि. १९) रात्री त्यांनी ही दोन्ही वाहने आपल्या घरासमोर लावून ते घरात झोपले होते. मात्र, मंगळवारी (दि.२०) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास कुटूंबियांना अचानक जाग आली. तेव्हा दोन्ही गाड्यांना आग लागली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगीमध्ये दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या आगीत २ लाख ९८ हजार रुपयांची टाटा बिगर व ६ लाख ९५ हजार रुपयांची ट्रॅम्पो ट्रॅव्हल्स, असे एकूण ९ लाख ९३ हजार रुपये किमतीच्या गाड्या जळून खाक झाल्या आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अज्ञात इसमाने हेतुपुरस्सर ही आग लावली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोखंडे करीत आहे.