फ्लायओव्हरचे काम नागरिकांनी बंद पाडले, सर्व्हिस रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी     |      गटार साफसफाई करताना दोघांचा मृत्यू     |      गटार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी--आमदार सत्यजित तांबे     |      चंदनापुरी घाटात स्कूल बस पलटी, विद्यार्थी जखमी; वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह     |      संगमनेर पंचायत समितीत थोरात-विखे समर्थक एकमेकांना भिडले, जोरदार घोषणाबाजी करत आरोप-प्रत्यारोप; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात     |      तर स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहन करू !     |      म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेच्या सेवेसाठी खुला     |      संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च     |      प्रवरानदी पात्रात वाळू चोरी करताना तस्कराला रंगेहात पकडले ! सहा जणांवर गुन्हा दाखल     |      अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी     |     
सिंचनापासून वंचित राहिलेल्या सर्व गावांचे होणार सर्वेक्षण By Admin 2025-06-12

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




मुंबईतील जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकी नंतर आ.अमोल खताळ यांची माहिती

संगमनेर प्रतिनिधी

       संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील दिर्घकाळ प्रलंबित पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी  मुंबई येथे जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या मंत्रालयातील दालनात विशेष बैठक पार पडली.या बैठकीत जल संपदा विभागाने बॅरेज बंधाऱ्यांचा पर्याय समोर आणला आहे. या माध्यमातून साकूर पठारभागाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असून, गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यावाचून वंचित असलेल्या पठारभागाला दिलासा मिळणार आहे.
   या बैठकीला आमदार अमोल खताळ, भाजपा तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख,रवी दातीर, अॅड .अमित धुळगंड यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील मोरवाडी धरणाच्या संदर्भात अनेक वर्षां पासून या भागातील नागरिकांची मागणी होती. याआधी भूसंपादनही झाले होते, मात्र धरण न झाल्याने जमीन शेतकर्यांना परत देण्यात आली होती. 2004 मध्ये तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री असताना कोणाच्या सांगण्यावरून न्यायालयाला पत्र देऊन जायकवाडीच्याखाली  कुठलेच धरण होणार नाही असे लेखी हमीपत्र राज्य शासनाच्या वतीने दिले गेलेले आहे.परंतु साकुर पठार भागासह तालुक्यातील पाणी प्रश्न कोणत्याही परिस्थिती मध्ये सोडवायचा असल्याने आमदार अमोल खताळ पा.यांनी   यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आग्रह धरला आहे,यानुसार  संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागासह तालुक्यातील निमोण  व तळेगाव या सर्व दुष्काळी भागाचे नव्याने सर्वेक्षण करून एक महिन्या च्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांनी दिल्याची माहिती आमदार अमोल खताळ पा.यांनी दिली आहे.तसेच सर्वेक्षण अहवाल आल्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर पुन्हा एकदा बैठक घेउन या भागातील पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास दिला असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले आहे.

 चौकट

    निमगाव भोजापूर धरणाची उंची, पाणी नियोजन, व्यवस्थापन संदर्भातही चर्चा झाली असून, त्यातून पाणी मिळव ण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.निळवंडे डावा व उजवा कालवा, तसेच राहठीचा दरा येथे धरण बांधण्या च्या बाबतही विचार सुरू आहे. “तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पाणी मिळणारच आहे असा ठाम विश्वास व्यक्त करत  ते म्हणाले की पाण्यापासून वंचित राहणार्या सायखिंडी, कऱ्हे व इतर सर्व गावाचा सर्वे करून भविष्यात एकही गाव पाण्यावाचून राहणार नाही, यासाठी जलसंपदामंत्री विखे पाटील आणि मी स्वतः  प्रयत्नशील राहू असा विश्वास आ अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे.
चौकट : 

मुंबईत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा व जलसंपदाच्या प्रमुखआधिकार्याच्या समवेत बैठक झाली या बैठकीतमोरवाडी धरणाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली मात्र हे मोरवाडी धरण होऊ नये यासाठी इथून मागच्या लोकप्रतिनिधींनी  खोडे घालून ठेवले होते त्यामुळे आजपर्यंत ते धरण झाले नाही मात्र मोरवाडी धरण झाले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे मात्र या परिसरात सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी बॅरेंज बंधाऱ्यांचा पर्याय पुढे आला आहे हे बॅरेज बंधारे मोरवाडी साकुर जांबुत आणि शिंदोडी येथील घोडी किती वेळ असे बंधारे करण्याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेले आहेत मंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या माध्यमातून साखर पठार भागाचा सिंचनाचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल 

 श्री गुलाब भोसले 

तालुकाध्यक्ष भाजपा


चौकट
 विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न आमदार अमोल अमोल खताळ पा.यांनी विधान सभेत मांडला त्यानंतर आमदार अमोल खताळ पा.यांच्या विशेष प्रयत्नानेराज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री नामदार .राधाकृष्ण विखे पा.यांच्या माध्यमातून पठारभागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काम करत असुन सरकारची आणि लोक प्रतिनिधींची मानसिकता ही  सकारात्मक असुन लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.

- रऊफ शेख,
- महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य,
- भाजपा,अल्पसंख्यांक मोर्चा
-