लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी डॉक्टर अमोल कर्पे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी     |      ५० हजाराच्या लाच प्रकरणात पत्रकार आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात     |      महाविद्यालयातील तरुणीवर अत्याचार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल     |      संगमनेर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी राजेश मालपाणी तर व्हा.चेअरमनपदी मधुसूदन नावंदर यांची एकमताने निवड     |      हनुमान जयंती उत्सवात धुडगूस घालणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एक अल्पवयीन     |      जवळेकडलग - वडगाव लांडगा रस्ता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच     |     
काकडवाडीच्या महालक्ष्मी मंदिरातील सोने अन् ऐवज चोरणारी टोळी जेरबंद, सापळा रचला अन् असं केलं जेरबंद By Admin 2025-03-14

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




काकडवाडीच्या महालक्ष्मी मंदिरातील सोने अन् ऐवज चोरणारी टोळी जेरबंद, सापळा रचला अन् असं केलं जेरबंद

संगमनेर : अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील श्री महालक्ष्मी माता मंदिरात चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील 6 आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली केली आहे. आरोपीकडून देवीच्या मुर्तीचे चांदीचे टोप, चांदीचे टोपामधील सोन्याचे पान, मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र आणि इतर सोन्याचे दागीने असा एकूण 24,94,000 रुपये किमतीचे दागिने आणि ऐवज जप्त करण्यात आली आहे.
  8 मार्च रोजी संगमनेरच्या काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरात मंदिराचा दरवाजा आणि गाभाऱ्याचे कुलुप तोडुन देवीच्या मुर्तीवरील दागिन्यांची चोरी झाली होती. याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कसून चौकशी करत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे लोणी ते कोल्हार रोडवर सापळा लावून आरोपीना अटक केली आहे.
अटकेत असलेल्या आरोपीमध्ये सुयोग दवंगे, संदीप साबळे, संदीप गोडे, अनिकेत कदम, दिपक पाटेकर, सचिन मंडलीक यांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 199 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने, 1665 ग्रॅम वजनाचे चांदीचे विविध दागिने (पान, मुकूट, मणी, नेकलेस, कंबर पट्टा, चैन, नथी, मुर्ती, पादुका, छत्री, पंचारती इ.), 3 मोबाईल आणि एक फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. दरम्यान यातील मुख्य आरोपी सुयोग दवंगे याने नाशिक जिल्ह्यातील बालाजी मंदीर आणि सिन्नर येथील पुणे ते नाशिक रोडवरील वज्रेश्वरी मंदीरात चोरी केल्याची माहिती दिली आहे.
संबंधित पोलिस पथकाने त्यांची झडती घेतली असता 24,94,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात 199 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने, 1665 ग्रॅम वजनाचे चांदीचे विविध दागिने, 3 मोबाईल व एक कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे दवंगे याने कुंदेवाडी (ता.सिन्नर, जि.नाशिक) येथील बालाजी मंदिर व सिन्नर येथील पुणे ते नाशिक रस्त्यावरील वज्रेश्वरी मंदिरात चोरी केल्याची माहिती सांगितली. चोरी केलेला मुद्देमाल हा सचिन मंडलिक याच्या मध्यस्थीने विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती दिली. ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी संगमनेर तालुका पोलिसांत हजर करण्यात आले आहे.
आरोपींना कसं घेतलं जाळ्यात
पोलिस पथकाने घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना 13 मार्च रोजी सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दवंगे (रा.हिवरगाव पावसा, ता.संगमनेर) याने त्याच्या साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले आहे. पथकाने माहिती देणाऱ्याच्या मार्फत सुयोग दवंगे याची माहिती घेतली असता तो त्याचा साथीदार सचिन मंडलिक याच्या मध्यस्थीने गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळ्या रंगाच्या कारमधून (क्र.एमएच-04, एचएफ-1661) संगमनेर येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
पथकाने तत्काळ लोणी ते कोल्हार रस्त्यावर सापळा रचून संशयित कार मिळाली. त्यातून तिघे इसम पळून जाताना त्यांना ताब्यात घेतलं. पथकातील पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यांना व कारमधील आणखी तीन अशा एकूण सहा इसमांना ताब्यात घेतले असता त्यांनी सुयोग अशोक दवंगे (वय 21, रा.हिवरगाव पावसा, ता.संगमनेर), संदीप किसन साबळे (वय 23, रा.पाचपट्टावाडी, ता.अकोले), संदीप निवृत्ती गोडे (वय 23, रा.सोमठाणे, ता.अकोले), अनिकेत अनिल कदम (वय 21, रा.टिटवाळा, ता.कल्याण, जि.ठाणे), दीपक विलास पाटेकर (वय 24, रा.टिटवाळा, ता.कल्याण, जि.ठाणे), सचिन दामोदर मंडलिक (वय 29, रा.संगमनेर, ता.संगमनेर) अशी नावे असल्याचे सांगितले आहे.