माझी वसुंधरा योजनेअंतर्गत 1.5 कोटींच्या बक्षीस रकमेतून विविध विकासकामे मार्गी - आ.सत्यजीत तांबे     |      संगमनेरमध्ये गुरुवारी भाऊबीज निमित्त रंगणार दिवाळी पहाट गाणी     |      संगमनेर शहरातील रस्त्यांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर - आ खताळ     |      ऐतिहासिक शहागडावर दीपावलीनिमित्त मशाल उत्सव साजरा     |      नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |     
पालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये ? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात By Admin 2025-05-16

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




पालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये ? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

मुंबई  : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये पूर्ण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. प्रभाग रचना, आरक्षण व मतदार याद्यांचे काम पूर्ण केल्यावर मगच पावसाचा अंदाज घेऊन निवडणुका कधी घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाणार आहे.

बहुधा निवडणुका पावसाळ्यानंतरच घेतल्या जातील, असे संकेत आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व म्हणजे २९ महापालिका आणि ३२ जिल्हा परिषदांसह ६८७ स्थानिक स्वराज्य संस्था तसेच दीड हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सुरू केली. या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारकडे असल्याने लवकरात लवकर प्रभाग रचना करण्याचे आदेश सरकारला दिल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन ते पाच वर्षांपासून प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचा सर्व कारभार सध्या प्रशासकांकडे आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (६ मे) रोजी राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकारला दिले होते. या निवडणुकांची घोषणा चार आठवड्यांमध्ये करण्यात यावी, बांठिया आयोगाचा अहवाल बाजूला ठेवून २०२२ च्या पूर्वी इतर मागास प्रवर्गास (ओबीसी) जेवढे राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देण्यात येत होते, ते आरक्षण कायम ठेवून निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले होते.

आयोगाने नगरविकास आणि ग्रामविकास विभागास पत्र पाठवून किमान दोन-अडीच महिन्यांत प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रभाग रचनेस सुमारे दोन-अडीच महिन्यांचा, आरक्षणासाठी १५-२० दिवस तर प्रभागनिहाय मतदार याद्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यास सुमारे महिनाभराचा कालावधी लागणार आहे.

पावसाचा अंदाज घेऊनच निर्णय