फ्लायओव्हरचे काम नागरिकांनी बंद पाडले, सर्व्हिस रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी     |      गटार साफसफाई करताना दोघांचा मृत्यू     |      गटार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी--आमदार सत्यजित तांबे     |      चंदनापुरी घाटात स्कूल बस पलटी, विद्यार्थी जखमी; वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह     |      संगमनेर पंचायत समितीत थोरात-विखे समर्थक एकमेकांना भिडले, जोरदार घोषणाबाजी करत आरोप-प्रत्यारोप; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात     |      तर स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहन करू !     |      म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेच्या सेवेसाठी खुला     |      संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च     |      प्रवरानदी पात्रात वाळू चोरी करताना तस्कराला रंगेहात पकडले ! सहा जणांवर गुन्हा दाखल     |      अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी     |     
फ्लायओव्हरचे काम नागरिकांनी बंद पाडले, सर्व्हिस रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी By Admin 2025-07-12

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




फ्लायओव्हरचे काम नागरिकांनी बंद पाडले, सर्व्हिस रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी

संगमनेर पुणे-नाशिक : राष्ट्रीय महामार्गावर घुलेवाडी शिवारातील हॉटेल स्टेटसजवळ असणाऱ्या सर्विस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असताना, त्याकडे दुर्लक्ष करून संबंधित ठेकेदार फ्लायओव्हरचे काम करीत असल्याचे निदर्शनास आल्यावर परिसरातील नागरिकांनी हे काम बंद पाडून सर्व्हिस रस्त्यावर पडलेले

खड्डे त्वरित बुजवून दुरुस्ती करण्याची मागणी केली. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे सध्या रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. तसेच, अनेक ठिकाणी फ्लायओव्हरचे काम सुरू आहे. त्यातच सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम करताना कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळे

अनेक अपघात झाले आहेत. तसेच अपघात होण्याची दाट

शक्यता आहे. ज्या ज्या ठिकाणी फ्लायओव्हरचे काम सुरू आहे.

त्याच्या बाजूने ये-जा करणाऱ्या रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून, त्याचा त्रास वाहनाना होत आहे. ही सर्व विकासकामे, गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकावू व निर्धारित वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. या परिसरात अपघात होऊ नये, म्हणून कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने केलेली नाही, यात आपण लक्ष घालावे

अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी थेट रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण झाली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा ग्राहक पंचायतीचे विनायक वाडेकर, रोशन कोथमिरे, शाम नाईकवाडी, सीताराम पानसरे, प्रशांत राऊत, सचिन आव्हाड, सोनू रुपवते आदींनी दिला आहे.