फ्लायओव्हरचे काम नागरिकांनी बंद पाडले, सर्व्हिस रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी     |      गटार साफसफाई करताना दोघांचा मृत्यू     |      गटार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी--आमदार सत्यजित तांबे     |      चंदनापुरी घाटात स्कूल बस पलटी, विद्यार्थी जखमी; वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह     |      संगमनेर पंचायत समितीत थोरात-विखे समर्थक एकमेकांना भिडले, जोरदार घोषणाबाजी करत आरोप-प्रत्यारोप; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात     |      तर स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहन करू !     |      म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेच्या सेवेसाठी खुला     |      संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च     |      प्रवरानदी पात्रात वाळू चोरी करताना तस्कराला रंगेहात पकडले ! सहा जणांवर गुन्हा दाखल     |      अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी     |     
जेजुरी गडावर संगमनेर येथील होलम राजाच्या काठीसह                              जेजुरी गडावर मानाच्या शिखर काठ्यांचा देवभेट सोहळा जल्लोषात By Admin 2025-02-14

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




जेजुरी गडावर संगमनेर येथील होलम राजाच्या काठीसह                              जेजुरी गडावर मानाच्या शिखर काठ्यांचा देवभेट सोहळा जल्लोषात

जेजुरी: खंडोबा देवाच्या माघी पौर्णिमा यात्रेनिमित्त मानाच्या होलम, होळकर, खैरे आणि प्रासादिक शिखर काठ्यांचा देवभेटीचा सोहळा जेजुरी गडावर जल्लोषात पार पडला. या वेळी हजारो भाविकांनी भंडार्‍याची उधळण करून 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष केला.मानाच्या व गावोगावच्या शिखर काठ्या माघी पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी जेजुरी गडावर नेऊन त्या खंडोबा मंदिराला टेकवून देवभेट घेण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. संगमनेर येथील होलम राजा, सुपे येथील खैरे आणि होळकर यांच्या मानाच्या शिखर काठ्या दरवर्षी जेजुरी गडावर येऊन देवभेटीचा सोहळा साजरा करतात.

माघी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी (दि. 13) सकाळी संगमनेर होलम राजाची शिखर काठी चिंचेची बाग, ऐतिहासिक गौतमेश्वर मंदिर, मारुती मंदिरमार्गे गडावर वाजतगाजत आणण्यात आली. सकाळी 11 वाजता होलम राजाच्या शिखर काठीचा देवभेट सोहळा पार पडला. या वेळी हजारो भाविकांनी भंडार्‍याची उधळण करून जल्लोष केला.

दुपारी 1 वाजता सुपे येथील खैरे व जेजुरीमधील अहिल्यादेवी होळकर यांची मानाची शिखर काठी गडावर वाजतगाजत आली. त्यानंतर देवभेटीचा सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी इतर सुमारे पन्नास प्रासादिक शिखर काठ्यांनी देवभेट घेतली.

या वेळी शिखर काठीचे मानकरी संगमनेर मल्हारी मार्तंड खंडोबा होलम राजा देवस्थानचे अध्यक्ष तुकाराम काटे महाराज, दिलीप गुंजाळ, मंगेश म्हेत्रे, काशिनाथ होलम, गणेश काटे तसेच या उत्सवानिमित्त संगमनेरचे आमदार अमोल खताळ, खैरे सुपे यांचे मानकरी शहाजी खैरे, आबा खैरे, शरद खैरे, भगवान खैरे, देविदास भुजबळ, अमोल अपसुंदे, नवनाथ लांडगे, रामनाथ ढिकले व होळकर काठीचे मानकरी बबनराव बय