लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी डॉक्टर अमोल कर्पे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी     |      ५० हजाराच्या लाच प्रकरणात पत्रकार आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात     |      महाविद्यालयातील तरुणीवर अत्याचार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल     |      संगमनेर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी राजेश मालपाणी तर व्हा.चेअरमनपदी मधुसूदन नावंदर यांची एकमताने निवड     |      हनुमान जयंती उत्सवात धुडगूस घालणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एक अल्पवयीन     |      जवळेकडलग - वडगाव लांडगा रस्ता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच     |     
बनावट नोटा'तील आरोपी ग्रामपंचायत कर्मचारी By Admin 2025-02-22

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




आरोपी रहाणेला पाच दिवसांची पोलिस कोठडी

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा
संगमनेरातील बनावट नोटा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रजनीकांत राहणे यास काल शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली. दरम्यान रजनीकांत राहणे हा गुंजाळवाडी ग्रामपंचायत कर्मचारी आहे. दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी पुणे गुप्तचर विभागाला माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुण्याचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी झाकीर हुसेन मुल्ला, उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, उपनिरीक्षक समीर अभंग, पोलिस कर्मचारी हरिश्चंद्र बांडे, राहुल डोके, राहुल सारबंदे या सर्वांनी संयुक्तपणे कारवाई करत रहाणे मळा गुंजाळवाडी येथील घरावर गुरुवारी सकाळी छापा टाकला. रजनिकांत रहाणे हा साहित्यासह घरी सापडला. या छाप्यात बनावट नोटा बनविण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर, कागद आणि चलनातील चांगल्या व काही खराब बनावट नोटा ताब्यात घेतल्या. त्याला अटक करून शुक्रवारी न्यायालयासमोर उभे केले असता २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

'त्या' दिवशीही तो कामावरच !
अधिक माहिती घेतली असता रजनीकांत राजेंद्र राहणे हा गुंजाळवाडी ग्रामपंचायत क्लर्क या पदावर काम करत आहे. गेल्या दहा वर्षापासून तो ग्रामपंचायतीत कामगार असून घटना घडल्याच्या दिवसापर्यंत तो कामावर होता. त्याचा कुठलाही रजेचा अथवा सुट्टीचा अर्ज ग्रामपंचायतीला दिलेला नव्हता.

गुंजाळवाडीचे सरपंच म्हणतात....
याबाबत गुंजाळवाडीचे सरपंच अमोल गुंजाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीं राहणे हा गुंजाळवाडी ग्रामपंचायतीत काम करत असल्याचे सांगितले. मात्र घडलेली घटना ही त्याची वैयक्तिक बाब असून त्याचा ग्रामपंचायतीशी काही संबंध नाही. राहणे याने नोटा छापून चलनात आणल्या का, याबाबत पोलिस तपास करत आहे.