लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी डॉक्टर अमोल कर्पे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी     |      ५० हजाराच्या लाच प्रकरणात पत्रकार आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात     |      महाविद्यालयातील तरुणीवर अत्याचार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल     |      संगमनेर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी राजेश मालपाणी तर व्हा.चेअरमनपदी मधुसूदन नावंदर यांची एकमताने निवड     |      हनुमान जयंती उत्सवात धुडगूस घालणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एक अल्पवयीन     |      जवळेकडलग - वडगाव लांडगा रस्ता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच     |     
देशी दारू दुकानाचा गल्ला पळवला दुचाकीवरील बॅगेत होते तीन लाख रुपये By Admin 2025-02-26

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




देशी दारू दुकानाचा गल्ला पळवला दुचाकीवरील बॅगेत होते तीन लाख रुपये

संगमनेर
दिवसभर जमा झालेली देशी दारुच्या दुकानातील रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या व्यवस्थापकाला धक्का देत तब्बल ३ लाख १९ हजार रुपयांची रोकड घेवून चोरटा फरार झाला. या प्रकरणी व्यवस्थापक विकास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि २४) दुपारी साडेतीनच्या सुमारास दाट लोकवस्तीच्या परदेशपूरा भागात ही घटना घडली. बालमशेठ परदेशी यांच्या देशी दारुच्या दुकानात दिवसभरात जमा झालेल्या रकमेसह शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या दिवशी गोळा झालेला एकूण ३ लाख १९ हजार १६० रुपयांचा भरणा घेवून दारू दुकानाचे व्यवस्थापक विकास शिंदे बडोदा बँकेत भरणा करण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांनी आपल्याजवळील रक्कम असलेली बॅग आपल्या दुचाकीच्या शीटजवळ ठेवली. यावेळी आधीपासूनच त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या अज्ञात चोरट्याने नेमकी संधी साधून भरधाव वेगाने दुचाकी घेवून येत शिंदे यांनी त्यांच्या मोपेडवर ठेवलेली रोकड असलेली बॅग उचलली आणि तेथून पोबारा केला. यावेळी शिंदे यांनी आरडाओरड केल्यानंतर काहीजणांनी धावपळ करीत चोरट्याचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो पर्यंत चोरटा रोकड घेवून पसार झाला होता.