लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी डॉक्टर अमोल कर्पे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी     |      ५० हजाराच्या लाच प्रकरणात पत्रकार आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात     |      महाविद्यालयातील तरुणीवर अत्याचार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल     |      संगमनेर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी राजेश मालपाणी तर व्हा.चेअरमनपदी मधुसूदन नावंदर यांची एकमताने निवड     |      हनुमान जयंती उत्सवात धुडगूस घालणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एक अल्पवयीन     |      जवळेकडलग - वडगाव लांडगा रस्ता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच     |     
पिंपळगाव देपा, सायखिंडीसाठी टँकर मंजूर संगमनेर तालुक्यात पाणीटंचाई; दरेवाडी, वरवंडीचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल By Admin 2025-03-05

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




पिंपळगाव देपा, सायखिंडीसाठी टँकर मंजूर संगमनेर तालुक्यात पाणीटंचाई; दरेवाडी, वरवंडीचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल

संगमनेर तालुक्यात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवत आहे. यामुळे सायखिंडी व पिंपळगाव देपा या दोन गावांच्या टँकर मागणीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच या गावांसाठी टँकर सुरू होणार आहेत. दरम्यान, वरवंडी व दरेवाडी या दोन गावांनी टैंकर मागणीचे प्रस्ताव दाखल केले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. उन्हाळा सुरू होतात तालुक्यात पाणी टंचाई जाणू लागते, मात्र यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडी उशिरा टंचाई जाणवत आहे. २०२३ यावर्षीडिसेंबर महिन्यातच टँकर सुरू झाला होता. फेब्रुवारी २०२४ मध्ये २ टैंकर सुरू करण्यात आले होते. पावसाने दडी मारल्यामुळे ऑगस्ट अखेर टैंकर सुरू होते, मात्र यंदा मार्चच्या सुरूवातीला टैंकर सुरू झाले नाही. सायखिंडी व पिंपळगाव देपा या दोन गावांनी टँकरची मागणी केली होती. यानुसार या गावांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. दरेवाडी व वरवंडी गावांनी टैंकर मागणीचे प्रस्ताव दाखल केले, मात्र अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. पंचायत समितीने तालुक्यातील यंदाची पाणी टंचाई लक्षात घेता, टंचाई आराखडा सादर केला आहे. तीन-तीन महिन्यांचे दोन भाग केले आहेत. जूनअखेर ६१ गावे व त्या गावांतर्गत वाड्यांना २० टँकरने पाणी पुरवठा करावा लागेल, असा अंदाज गृहीत धरून, टंचाई आराखडा सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मंजूरी दिली आहे.
संगमनेर तालुक्यात उन्हाळ्याची चाहुल लागताच अनेक गावात पाणी टंचाई जाणवते. यामुळे ग्रामपंचायत आगामी पाणी टंचाई लक्षात घेता, पंचायत समितीकडे टंचाई आराखडा सादर करुन, टँकरची मागणी करतात. गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. अशात पावसाने उशिरा हजेरी लावल्याने संगमनेर तालुक्यात विहिरींनी तळ गाठला होता. यामुळे २०२४ मध्ये ऑगस्ट अखेर टँकर सुरू होते.
गेल्यावर्षी ८१.७५. मि.मि. पावसाची नोंद झाली. यामुळे डिसेंबर ते ऑगस्ट या टंचाईच्या काळात ४० गावे व १३२ वाड्यांना ३९ टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. यातच पावसाने उशिरा हजेरी लावल्याने संगमनेर तालुक्यात विहिरींनी तळ गाठला होता. यामुळे ऑगस्ट अखेर पर्यंत तालुक्यात टैंकर सुरू होते. यंदा मार्च महिना सुरू झाल्यानंतर केवळ दोन गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत.

३६ गावांना देणार पाणी!
पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी यंदा संगमनेर पंचायत समितीने ग्रामपंचायतीकडून आलेल्या टँकरच्या मागणीनुसार टंचाई आराखडा तयार करून, तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. आगामी पाणी टंचाई लक्षात घेता जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात ३६ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, असा टंचाई आराखडा सादर केला आहे. तीन- तीन महिन्यांचे दोन भागात जूनअखेर ६१ गावे व वाड्यांना २० टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या टंचाई आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूरी दिली आहे.