अहो, संगमनेर मध्ये चाललय काय     |      वंचित बहुजन आघाडीचा संगमनेर सेवा समितीला पाठिंबा     |      अमली पदार्थांच्या विळख्यात शहरातील तरुणाई, घातक अमली पदार्थांचे धंदे करणारे व करवणारे यांच्या पर्यत पोलिसांचे हात पोचणार काय ?     |      संगमनेरचे लोकप्रतिनिधी अमोल खताळ हे हिंदुत्वाचे वाट लावणारे सौ वैशाली तारे     |      दुहेरी मतदारांमध्ये सुवर्णा खताळ यांचे नाव हा कायदेशीर मुद्दा पुढे येत असल्याने वातावरण ढवळून निघत आहे      |      संगमनेर सेवा समिती ही राजकारण विरहित     |      संगमनेर मध्ये निवडणुकीच्या धामधुमीत कारमधून 1 कोटी रोख रक्कम जप्त     |      संगमनेरच्या पाणी योजनेचे कोपरगावात कौतुक     |      नगराध्यक्षपदासह सातजणांनी दाखल केली उमेदवारी ! संगमनेर नगरपालिका निवडणूक ऑफलाईन'च्या सुविधेने उत्कंठाही वाढवली     |      राजकीय पक्षांची संभाव्य धोका टाळण्यासाठी स्वातंत्र्य लढण्याची तयारी     |     
टेम्पो घरात घुसला; By Admin 2025-02-20

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




भींत अंगावर पडून चारजण गंभीर जखमी

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

शहरालगत असलेल्या घुलेवाडी येथे मालवाहू टेम्पो थेट पत्र्याच्या घरात घुसल्याने भिंत अंगावर पडून चारजण गंभीर जखमी झाले. यामध्ये चालकाचाही समावेश आहे. ही घटना मंगळवारी (दि.18) रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली.घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या समोर राजू मनोहर थोरात, सायली राजू थोरात व जुली राजू थोरात हे सर्वजण मंगळवारी रात्री जेवण करून घरात झोपले होते. रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास मालवाहू टेम्पो (क्रमांक एमएच.17, सीव्ही.1110) चा चालक अतिष विलास देवकर याचा टेम्पोवरील ताबा सुटून टेम्पो थेट थोरात यांच्या घराची भिंत तोडून सरळ घरात घुसला. यामुळे एकच गोंधळ उडाला. घरातील सदस्यांनी मोठ्याने आरडा-ओरडा केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील सदस्यांच्या अंगावर भिंत व पत्रे पडले होते. नागरिकांनी पत्रे बाजूला काढून जखमींना बाहेर काढले आणि औषधोपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, दैव बलवत्तर असल्याने थोरात कुटुंब हे या अपघातातून बालंबाल बचावले आहे, अन्यथा मोठी घटना घडली असती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान टेम्पो घरात घुसल्याने या घटनेमुळे थोरात कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत.









Special Offer Ad