शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |      दिल्लीतील 1500 वर्षे जुने प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ पाडण्याच्या कारवाईविरोधात संताप संगमनेर येथील भक्तांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी     |     
अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करा -- मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी By Admin 2025-04-03

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करा -- मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी

संगमनेर (प्रतिनिधी)--संगमनेर तालुक्याच्या पठार भागासह पश्चिम भागात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे . या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना  सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी मा. महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.



संगमनेर तालुक्यातील साकुर पठारा मधील हिवरगाव पठार, निमज ,नांदुरी दुमाला, सावरगाव तळ, चंदनापुरी मिर्झापूर ,धांदरफळ खुर्द या गावांमध्ये अवकाळी पाऊस व जोरदार गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे होणे नाले तसेच डोंगरकडेही काही वेळ जोरात वाळू लागले होते . शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टातून उभे केलेले कांदा ,उन्हाळी बाजरी, गहू, डाळिंब या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हा सातत्याने मोठ्या संकटात असून अवकाळी पावसाने हातात आलेली पिक वाया गेली आहे.

या  नुकसानग्रस्त पिकांची तातडीने पंचनामे करावे अशी मागणी माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली असून यावेळी ते म्हणाले की शेतकरी मोठ्या कष्टातून पीक उभे करतो. शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक अडचणी असतात. चांगले पीक उभे केल्यानंतर त्याला बाजार भाव मिळत नाही. कर्ज थांबत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्याला अस्मानी संकटाशी ही सामना करावे लागतो.

संगमनेर तालुक्यातील पठार व पश्चिम भागात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून टोमॅटो डाळिंब गहू उन्हाळी बाजरी व कांदे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट  ओढवले असून या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी याकरता सरकारने त्वरित नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून लवकरात लवकर या शेतकऱ्यांना भरी मदत करावी अशी मागणी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे केले आहे

Special Offer Ad