शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |      दिल्लीतील 1500 वर्षे जुने प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ पाडण्याच्या कारवाईविरोधात संताप संगमनेर येथील भक्तांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी     |     
संगमनेरात 'अवकाळी'मुळे 'टँकर'ला ब्रेक ! By Admin 2025-05-20

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




तालुक्यात २५ गावे, ६१ वाड्यांना २० टँकरद्वारे पाणी

संगमनेरः 

संगमनेर तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साठले आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात सध्या पाणी टँकरच्या मागणीला अचानक ब्रेक लागला आहे. सध्या तालुक्यात २५ गावांसह ६१ बाडांना २० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात पावसाने अक्षरशः थैमान घातले. संगमनेर तालुक्यातही गेल्या १० दिवसांपासून 'अवकाळी' ने हजेरी लावल्याने शेतात पाणी साठले आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बऱ्याच भागात अवकाळी पाऊस पडला. समनापूर, बडगाव पान, तळेगाव दिघे, चिंचोली गुरव, निमोण, घुलेवाडी, गुंजाळवाडी, चंदनापुरी, साकुरसह पठार भागातील अनेक गार्वामध्ये अवकाळी पाऊस पडला. तळपत्या मे महिन्यासह उन्हाळ्यात संगमनेर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवल्याने दरवर्षी टँकर सुरू असतात. यंदाही टँकर सुरू आहेत, मात्र अचानक 'अवकाळी'ने हजेरी लावल्याने टैंकर मागणीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. तालुक्यातील पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी,

पोखरी बाळेश्वर, वरवंडी, दरेवाडी, माळेगाव पठार, खांबे, डोळासने, कर्जुलेपठार, गुंजाळवाडी पठार, सायब्रिडी, चौधरवाडी, कुंभारवाडी, जांभूळवाडी, पारेगाव बुद्रुक, निमोण, सोनोशी, कोठे मलकापूर,

रणखांबवाडी, नान्नज दुमाला, पानोडी, वनकुटे, अकलापूर आदी २५ गावांसह गावांतर्गत विविध ६१ बाड्यांसाठी २० टैंकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. ७ शासकीय, तर १३ खासगी टँकरचा यात समावेश आहे. मान्सून सुरू होण्यापूर्वीच पावसाला सुरुवात झाल्याने, जून महिन्यातही पाऊस पडणार का, अशी शेतकरी उपस्थित करीत आहेत. पाणी टंचाई जाणवल्याने तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती

पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करतात, मात्र 'अवकाळी'ने टैंकर मागणीचे प्रस्ताव सादर करण्याला सध्या ब्रेक लागला आहे. मान्सूनपूर्व पावसाळा असाच सुरू राहिल्यास, पाणी टँकरच्या मागणीत फारशी वाढ होणार नाही, मात्र ज्या गावात टैंकर सुरू आहेत, तेथे मात्र 'अवकाळी' चे प्रमाण अत्यल्प आहे. अनेक गावांमध्ये पाऊस पडला नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.



'अवकाळी'ची पुन्हा दमदार बॅटींग !

संगमनेर तालुक्यात काल (सोमवारी) दुपारी ४ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने दमदार बंटींग केली. तब्बल तासभर अवकाळी पाऊस सुरू होता. अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेतांमध्ये पाणी साठले आहे. 'अवकाळी'ची ही अवकळा संपणार तरी कधी, असा सवाल नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित करीत आहेत.



Special Offer Ad