अमली पदार्थांच्या तस्करी मागे हप्तेखोरी हे एकमेव कारण * अमली पदार्थांची वाढलेली तस्करी अत्यंत चिंतेची     |      संगमनेर आता ड्रग्सच्या विळख्यात धोकादायक अवैद्य धंद्यांची नव्याने भर पोलीस कारवाईत २.२३ लाखांच्या मुद्देमाल जप्त     |      लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मधील वाढलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीबाबत केली होती चिंता व्यक्त     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |     
अमली पदार्थांच्या तस्करी मागे हप्तेखोरी हे एकमेव कारण * अमली पदार्थांची वाढलेली तस्करी अत्यंत चिंतेची By Admin 2025-11-03

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




अमली पदार्थांच्या तस्करी मागे हप्तेखोरी हे एकमेव कारण * अमली पदार्थांची वाढलेली तस्करी अत्यंत चिंतेची

संगमनेर (प्रतिनिधी)--चाळीस वर्ष हा तालुका आपण परिवार म्हणून सांभाळला. वाईट प्रवृत्ती येऊ दिल्या नाही. मात्र आता कधी न येणारे लोक हिंदुत्वाचा खोटा बुरखा पांघरून संगमनेर मध्ये येऊ लागले आहेत. धर्माच्या नावावर काळे धंदे सुरू केले आहेत. अमली पदार्थांची तस्करी सुरू झाली आहे. या पाठीमागे कुणाचा आशीर्वाद आहे हे ओळखा ,अमली पदार्थांच्या वाढलेल्या तस्करी मागे हप्ते खोरी हे एकमेव कारण असल्याची टीका  काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

 सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ते बोलत होते यावेळी मा. आमदार डॉ.सुधीर तांबे, रणजीतसिंह देशमुख, पांडुरंग पाटील घुले, सौ कांचनताई थोरात, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे , डॉ. जयश्रीताई थोरात , शंकरराव खेमनार, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, चाळीस वर्षे या तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना आपण तालुका परिवार म्हणून संभाळला. कधीही वाईट प्रवृत्ती येऊ दिल्या नाही. मात्र आता कधी न दिसणारे लोक तालुक्यात येऊ लागले आहेत. हिंदुत्वाचा खोटा बुरखा पांघून वावरत आहे. त्यांनी संगमनेर बसस्थानकासमोर कार्यक्रम घेतले. लोकांमध्ये सहभागी होत आहेत. भ्रष्टाचारांचे आरोप असलेले धर्माच्या नावावर फिरत आहेत. अमली पदार्थाची तस्करी सुरू झाली आहे .

संगमनेर मध्ये ड्रग्स , अमली पदार्थ इंजेक्शन, लिक्विड या गोष्टी येऊ लागल्या आहेत. विविध अमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहे. हे लोक शेजारील तालुक्यांमध्ये होते अनेक तालुके त्यांनी उध्वस्त केले आता आपल्याकडे येऊ लागले आहेत. जे कधी होत नव्हते ते आता होत आहे. सुरू झालेली हप्तेखोरी हे यामधील एकमेव कारण आहे .या पाठीमागे कोण आहे. कोण संरक्षण देतो आहे. हे ओळखा अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे .याचबरोबर त्यांच्या मागे असलेल्या शक्तींवरही कठोर कारवाई झाली पाहिजे.

कारण गुन्हेगाराला जात धर्म काही नसतो. गुन्हेगार गुन्हेगार असतो. तरुण पिढी उध्वस्त करणाऱ्या अशा लोकांना माफी नको.

Special Offer Ad