दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
नासिक- पुणे रेल्वे चा मार्ग बदलल्यामुळे संगमनेर करांमध्ये प्रचंड संतापाची लाट जन आंदोलन करण्याची तयारी
संगमनेर, प्रतिनिधी –
नाशिक-पुणे रेल्वे मार्ग संगमनेरऐवजी शिर्डीमार्गे वळवल्यामुळे संगमनेर तालुक्यासह सिन्नर, नारायणगाव, खेड, मंचर या भागांमध्ये आता प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केलेल्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात यासाठी जमिनी आरक्षित करून शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात आला होता, तो मार्ग अचानक बदलल्याने जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. केंद्र सरकारने हा मार्ग बदलण्याचा घाट घातल्याबद्दल रेल्वे जनआंदोलन समितीने महायुतीमधील सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले असून, आता राजकारण न करता या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन सर्वपक्षीय नागरिकांना केले आहे.केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत ही रेल्वे शिर्डीमार्गे जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर लगेचच आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेरकरांना एकत्र करून मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला आहे. याला सर्वपक्षीय नागरिकांनी तात्काळ पाठिंबा दिला असून, संगमनेर तालुक्यात सह्यांची मोहीम, डिजिटल कॅम्पेनिंग आणि ऑनलाईन याचिका दाखल करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू झाली आहे. संगमनेर हे केवळ बाजारपेठेचे ठिकाण नाही, तर शैक्षणिक आणि मेडिकल हब म्हणून ओळखले जाते. व्यापाराच्या आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नाशिक-पुणे रेल्वे या शहरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्याने मोठा विकास साधला आहे. तालुक्यात काकडी आंतरराष्ट्रीय विमानतळ, उत्तरेकडून समृद्धी महामार्ग, प्रस्तावित सुरत-हैदराबाद महामार्ग, निळवंडे धरण कालवे, हायटेक इमारती आणि नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण व काँक्रिटीकरण यांसारखे मोठे प्रकल्प झाले आहेत. या सर्व विकास साखळीमध्ये नाशिक-पुणे रेल्वेचा संगमनेर मार्ग अंतिम दुवा ठरणार आहे.आमदार सत्यजित तांबे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ही रेल्वे संगमनेरमधूनच
संगमनेरकरांच्या विकासासाठी आता राजकीय इच्छाशक्तीची नव्हे, तर जनशक्तीच्या एकजुटीची गरज आहे, हेच या आंदोलनातून स्पष्ट होत आहे.