दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
पुणे- नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच झाली पाहिजे आमदार अमोल खताळखताळ यांनी विधान भवनात हातात फलक घेऊन वेदले सरकारचे लक्ष
पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर शहरातूनच गेला पाहिजे, या मागणीकडे राज्य सरकारचे आणि विधिमंडळाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे (महायुती) आमदार अमोल खताळ पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात एक आगळेवेगळे आणि लक्षवेधी आंदोलन केले. त्यांनी 'पुणे-नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच गेली पाहिजे' या मागणीचे घोषवाक्य लिहिलेला टी-शर्ट परिधान केला तसेच हातात फलक घेऊन थेट विधानभवनात प्रवेश केला. या कृतीने विधानभवनातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि संगमनेरकरांच्या भावना शासनापर्यंत पोहोचल्या
आमदार खताळ यांनी अधिवेशनात या प्रश्नावर आवाज उठवण्याचे आश्वासन दिले होते.