दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संत सदगुरु बाळूमामा यांच्या पालखीचे समनापूर मध्ये हजारो भाविकांकडून दर्शन
समनापुर : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सद्गुरु बाळूमामा यांच्या मेंढ्या आणि पालखी नंबर १ चे समनापुर येथे मंगलमय आगमन झाले. हजारो भक्तांनी पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले.
भक्तिमय वातावरणात संत सद्गुरु बाळूमामा यांची आरती करण्यात आली.यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृत वाहिनी बँकेचे संचालक राजेंद्र गुंजाळ, भास्कर शेरमाळे, जगन चांडे, पोपट शेरमाळे, गणेश शेरमाळे, ग्रामविकास अधिकारी सुनील नागरे, तंटामुक्ती अध्यक्ष सोमनाथ शेरमाळे, रामनाथ शेरमाळे, संजय चांडे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समनापुर परिसरात जय बाळूमामा, चांगभलं चा गजर घुमला. हा सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी समनापुर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.