दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
वडगावपान शिवारात एका गोडाऊनला आग
संगमनेर तालुक्यातील कोल्हार घोटी रोडवर असलेल्या वडगाव पण शिवारात एका गोडाऊनला गुरुवार दि. २७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता आग लागल्याने गोडाऊनचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास दीड तासानंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश मिळाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
याबाबत माहीती अशी की, संगमनेर तालुक्यात सध्या विविध ठिकाणी आगीच्या घटना घडत आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान होताना दिसत आहे तालुक्यातील कोल्हार घोटी राज्य मार्गावर असलेल्या समनापुर - वडगाव पान शिवारात आसिफ भाई मलिक स्वमालकीचा प्लॉट मध्ये भंगार दुकान आहे. गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास शॉक सर्किट झाल्याने अचानकपणे भंगाराच्या दुकानाला आग लागली. आग लागल्याने भंगार दुकानातील कामगार व आजूबाजूच्या नागरिकांची मोठी धावपळ सुरू झाली. यावेळी संगमनेर नगरपालिका संगमनेर साखर कारखाना तसेच लोणी वरून अग्निशामक दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी आल्या होत्या जवळपास दीड तास ही आग विझवण्याचे काम सुरू होते. अखेर दीड तासाच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली. आग विझल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या आगीत टायर गाडीचे पार्ट कुशन व इंजिनचे पार्ट जळून खाक झाले आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.