रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याला तीन पुरस्कार By Admin 2025-03-27

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याला तीन पुरस्कार

अहिल्यानगर दि.२६-  जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (मशीन लर्निंग)  वापर करणाऱ्या उपक्रमाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.   २०२३-२४ च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उल्लेखनीय कार्याला पुरस्कृत करण्यात आले असून राज्यातील प्रथम  क्रमांकाचा १० लक्ष रुपयांचा पुरस्कार अतिरिक्त जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना जाहीर झाला आहे. २०२४-२५ साठी शासकीय अधिकाऱ्यांमध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले, तर शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये राहाता येथील मंडळ अधिकारी मोहसीन शेख  यांनाही प्रत्येकी ५० हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांना यापुढच्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अहिल्यानगर जिल्हा राज्यात अनेक क्षेत्रात अग्रेसर असून त्यामागे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रयत्न आहेत. जाहीर झालेल्या पुरस्काराने जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली असून या पुरस्कारामुळे इतरांनाही चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Special Offer Ad