हा पुरावा देणे बंधनकारक नाहीतर रेशनकार्ड होणार बंद; राज्य शासनाचे आदेश     |      नांदुरी दुमाला व मिर्झापूर येथे अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली.     |      अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय टेक्निकल प्रदर्शनात प्रथम क्रमांक     |      थोरात कारखाना निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी १३३ इच्छुकांच्या अर्ज दाखल विरोधकांकडून उमेदवार दाखल न करण्याच्या निर्णयामुळे निवडणुकीची वाटचाल बिनविरोधकडे     |      चॉपरने वार करून ३५ हजारांचा ऐवज लुटला; ४ जणांविरुद्ध गुन्हा     |      नवी मुंबईत हत्येचा थरार; ओला कार चालकाची हत्या, प्रेमी युगल संगमनेर पोलिसांच्या ताब्यात     |      जवळे कडलग - वडगाव लांडगा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थांमधून संताप     |      संगमनेरात नामांकित डॉक्टर अमोल कर्पेवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार व पोक्सोअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल     |     
कर्तव्य बजावतांना संगमनेरच्या सैनिकाला वीरमरण, मेंढवण गावावर शोककळा By Admin 2025-03-26

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




कर्तव्य बजावतांना संगमनेरच्या सैनिकाला वीरमरण, मेंढवण गावावर शोककळा

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावावर शोककळा पसरली आहे. जम्मू-कश्मीरच्या तंगधार क्षेत्रात सोमवार, २४ मार्च २०२५ रोजी पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देताना एक दुर्दैवी घटना घडली.
गोळीबारात संगमनेरचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील हवालदार रामदास साहेबराव बढे (वय ४४) गंभीर जखमी झाले आणि त्यांना वीरमरण प्राप्त झाले.
३४ एफ रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर असलेल्या रामदास यांचे पार्थिव काश्मीर खोऱ्यातून विमानाने मुंबईत आणले जाणार असून, बुधवार, २६ मार्च रोजी दुपारी १ वाजता मेंढवण गावात लष्करी सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
रामदास हे नियंत्रण रेषेजवळ ऑपरेशनल ड्युटीवर तैनात होते, जिथे पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत त्यांनी शौर्य दाखवत प्रत्युत्तर दिले,
परंतु गोळी लागल्याने त्यांचे निधन झाले. अंत्यसंस्कारात युद्धातील अपघातांसाठीच्या मानकांचे पालन केले जाईल.अत्यंत गरिबीतून लढत रामदास यांनी सैन्यदलात प्रवेश केला होता आणि देशसेवेसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.त्यांच्या बलिदानाने मेंढवणसह संपूर्ण संगमनेर तालुक्यात शोक व्यक्त होत असून, त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहिली जात आहे. "दोस्तो..साथीयों, हम चले, दे चले" अशा शब्दांत त्यांच्या या निर्गमनाला सलाम दिला जात आहे.