संगमनेर दोन प्रभागात तिघांची माघार पालिका निवडणुकीसाठी तीन प्रभागात एका जागेसाठी नऊ उमेदवार रणांगणात     |      पुणे-नाशिक' रेल्वेवरुन जनआंदोलन पेटतंय     |      संगमनेरमध्ये 1 जानेवारी पासून सहकारमहर्षी T 20 राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा     |      संगमनेर जवळील सुकेवाडीत सुमारे 300 किलोहून अधिक गांजा पकडला अंदाजे किंमत 50 लाखांहून अधिक..     |      गुटखा माफियांना मकोका लावणार; कायद्यात सुधारणा करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा     |      सत्यजीत तांबेंचा 'हिसका', उपनिबंधक जाधवांची उचलबांगडी     |      तुकडेबंदी शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर आता NA नाही गरज     |      आशीर्वाद नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अरुण ताजणे तर व्हा चेअरमनपदी रवींद्र पावबाके यांची एकमताने निवड     |      रमेशराव देशमुख यांचे निधन     |      घारगाव शिवारात आढळलेल्या बालकाच्या मृतदेहाची ओळख पटली आई वडील सह वाहन चालकालाही अटक     |     
जवळे कडलग - वडगाव लांडगा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थांमधून संताप By Admin 2025-04-07

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




जवळे कडलग - वडगाव लांडगा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थांमधून संताप

संगमनेर : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेले तालुक्यातील जवळे कडलग  ते वडगाव लांडगा या रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून रखडले आहे.  रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याने या रस्त्यावरून ये - जा करणे अवघड होत आहे.यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.                          जवळे कडलग ते वडगाव लांडगा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे ‌. या रस्त्याची दुरुस्ती करावी याबाबत ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली ‌  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. ३ कोटी २५ लाख रुपये या रस्त्याच्या कामासाठी मंजूर झालेले आहे. या रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात आल्यानंतर या रस्त्याचे काम येवले कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले.

विधानसभा निवडणुका होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटूनही या रस्त्याचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. तालुक्यात राजकीय सत्तांतर झाल्याने राजकीय श्रेय  वादात या रस्त्याचे काम अडकले असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या या रस्त्याचे काम सुरू न झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड होत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत  करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी तालुक्यामध्ये एकच अभियंता आहे , या अभियंत्याला बसण्यासाठी कार्यालय नाही.  या खात्याच्या माध्यमातून तालुक्यात होणाऱ्या रस्त्यांच्या कामाची   अधीक्षक अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याने  चौकशी करावी अशी मागणी या भागातील  ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील देशमुख, संदेश देशमुख, सुरेश कडलग, गोरख लांडगे, मदन देशमुख, सोमनाथ लांडगे, बापू देशमुख, अशोक देशमुख आदींनी केली आहे.







Special Offer Ad