दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
आंदोलनातील शब्द तातडीने पूर्ण
संगमनेर ( प्रतिनिधी ) जवळे कडलग येथील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मयत झालेल्या सिद्धेश सुरज कडलग यांच्या कुटुंबीयांना आमदार सत्यजित तांबे यांच्या तातडीच्या पाठपुराव्यातून 10 लाख रुपयांची मदत महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाच्या वतीने देण्यात आली असून सकाळी आंदोलनात दिलेला शब्द आमदार तांबे यांनी कृतीसह पाठपुराव्यातून 6 तासात पूर्ण केला.
13 डिसेंबर 2025 रोजी जवळेकडलग येथील चार वर्षीय सिद्धेश सुरज कडलक याचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा ही मागणी वारंवार होत आहे. याकरता आमदार सत्यजित तांबे डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेर मध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. या मोर्चामध्ये सिद्धेश कडलग याचे वडील सुरज कडलग सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाने अत्यंत असंवेदनशीलपणा दाखवल्याने आमदार सत्यजित तांबे व डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर प्रशासन नरमले.