दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
जनआक्रोश मोर्चाने राज्य सरकारचे लक्ष वेधले
संगमनेर (प्रतिनिधी)--संगमनेर तालुक्यात वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून सुमारे 12 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. बिबट्यांच्या पासून दहशतमुक्तते करता संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिकांनी रस्त्यावर येऊन सरकार विरोधात आंदोलन केले याच वेळी बिबट्यांची मोजणी करून सर्वांची नसबंदी करा अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली तर महिला, विद्यार्थी यांना भयमुक्त करण्यासाठी शासनाने बिबट्यांबाबत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे.