उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच
By Admin 2026-01-15
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच
संगमनेर:-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, दि. १३ रोजी गुंजाळवाडी येथील शिवसेनेचे निष्ठावंत मा. उपजिल्हा प्रमुख रावसाहेब गुंजाळ यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडली. या बैठकीत पदाधिकारी व शिवसैनिकांशी थेट संवाद साधताना आपसातील मतभेद व मनभेद बाजूला ठेवा,
उत्तर नगर जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी केले.. आता फक्त शिवसेना ! असा स्पष्ट व आक्रमक संदेश देण्यात आला. मुंबईतील शिवाजी पार्कवर जमलेला जनसागर ही केवळ सभा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारी गर्जना होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात परिवर्तन अटळ असून, महाराष्ट्र नव्या ऊर्जेने जागा होत आहे, असे कोते म्हणाले.