दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
तालुक्यातील तरुणाईचा उद्रेक, व्हिडिओने त्रस्त तरुणांनी माध्यमांशी साधला संवाद
संगमनेर ( प्रतिनिधी ) लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची ओळख ही विकसित आणि सुसंस्कृत तालुका म्हणून राज्याला झाली आहे. मात्र मागील एक वर्षापासून तालुक्यामध्ये अमली पदार्थांची तस्करी दहशत गुंडगिरी वाढली असून या पाठीमागे कोण आहे हे सर्वांना माहिती आहे. नवीन लोकप्रतिनिधी यांनी मागील एक वर्षात खोटे व्हिडिओ बनवणे आणि फ्लेक्स बाजी शिवाय एक तरी विकासाचे काम केले का असा सवाल विचारताना विधानसभेमध्ये खोटी माहिती सांगून तालुक्याची व आपली बदनामी केल्याप्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचे सार्थक कांदळकर साईराज कांदळकर व अक्षय दिघे यांनी म्हटले आहे.