दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
महिलांच्या सक्षमतेसाठी विविध उपक्रम -डॉ. जयाताई थोरात
संगमनेर (प्रतिनिधी) --महिलांच्या चांगल्या आरोग्यासाठी एकविराच्या वतीने सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचबरोबर महिलांचे सबलीकरण , सक्षमीकरण करण्याबरोबरच करणे आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे हा एकविरा फाउंडेशनचा प्रमुख हेतू असून आतापर्यंत सुमारे 760 महिलांनी शिवण क्लास प्रशिक्षणाचा लाभ घेतला असल्याचे डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले आहे.
यशोधन कार्यालय येथे ज्या महिलांचा शिवण क्लास कोर्स पूर्ण झाला आहे. त्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी प्रशिक्षक शिला करंजकर, यशोधन कार्यालयाचे मुख्याधिकारी नितीन भांड, कार्यालयीन अधीक्षक रामदास तांबडे, सुरभी ताई मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, ग्रामीण व शहरी भागातील महिलांमध्ये अनेक कलागुण असून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी एकवीरा फाउंडेशन तर्फे प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात महिला बचत गटांची मोठी जाळे निर्माण झाली असून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. युवती व महिलांना स्वयंरोजगार मेळावा याकरता एकविराच्या माध्यमातून जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या शिवण क्लास कोर्समध्ये 760 महिलांना कोर्स पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ या महिलांना चांगल्या पद्धतीने झाला असून त्याचा फायदा त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी होत आहे.
ज्या महिलांनी शिवण क्लास चे प्रशिक्षण पूर्ण केले अशा 760 महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यात बेसिक शिवण क्लास व ऍडव्हान्स शिवण क्लास असे दोन प्रकार आहेत.
महिलांच्या वाढत्या मागणीनुसार पुन्हा बेसिक शिवण क्लास व ऍडव्हान्स शिवण क्लास सुरू करण्यात आले असून या दोन्ही प्रशिक्षण प्रकारांना महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याचबरोबर तालुक्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना चांगल्या प्रकारचे मार्केट मिळावे याकरता यशोधन कार्यालय व एकविराच्या माध्यमातून पॅकेजिंग व मार्केटिंग करतात बचत गटाच्या महिलांना मदत करण्यात आली आहे. यापुढेही महिलांच्या सबलीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याच्या त्या म्हणाल्या
यावेळी प्रशिक्षण घेतलेल्या विविध महिलांनी आपले मनोगते व्यक्त करून एक वेळा फाउंडेशनच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.